after salaar prithviraj sukumaran new movie the goat life first look out now
after salaar prithviraj sukumaran new movie the goat life first look out now SAKAL
मनोरंजन

The GOAT Life: 'सालार'नंतर पृथ्वीराजचा नवीन सिनेमा, प्रभासने शेअर केला फर्स्ट लूक

Devendra Jadhav

The GOAT Life Prithviraj Sukumaran News: प्रभास - पृथ्वीराज या दोघांचा सालार सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने लोकांचं चांगलं प्रेम मिळवलं. इतकंच नव्हे तर सालारने बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली.

प्रभास - पृथ्वीराज यांची मैत्री आपल्या सर्वांना माहितच आहे. प्रभासने पृथ्वीराजच्या आगामी The GOAT Life सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केलाय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते ब्लेसी आणि मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांचा ड्रीम प्रोजेक्ट, द गोट लाइफ.

हा सिनेमा १० एप्रिल २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

निर्मात्यांनी या चित्रपटाला 'आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट धाडस' म्हटले आहे. हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे.

भारतीय सिनेमात अनेक साहसी कथा बघायला मिळतात. द गोट लाईफ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण रिबेल स्टार प्रभासच्या हस्ते करण्यात आले.

प्रभासने सालारमधील सहकलाकार पृथ्वीराजच्या आगामी सिनेमाचा लूक शेअर केलाय. द गोट लाइफच्या पोस्टरमध्ये पृथ्वीराज न ओळखता येणार्‍या, खडबडीत लूकसहमध्ये खलनायकांचा सामना करायला तयार आहे.

द गोट लाइफमध्ये हॉलिवूड अभिनेता जिमी जीन-लुईस आणि अमला पॉल, के.आर. सारखे भारतीय कलाकार देखील आहेत. आगामी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आणि ध्वनी रचना अकादमी पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि रेसुल पुकुट्टी ह्यांनी केले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्वाकांक्षी द गोट लाइफ १० एप्रिल २०२४ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT