after satya manjrekar exit siddharth jadhav enter in mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat movie sakal
मनोरंजन

सत्याची एक्झिट.. सिद्धूची एंट्री.. मुलावरील टीकेनंतर 'वेडात मराठे..' चित्रपटात मांजरेकरांनी केला मोठा बदल..

महेश मांजरेकरच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाबाबत मोठी अपडेट मिळाली आहे.

नीलेश अडसूळ

siddharth jadhav in vedat marathe veer daudale saat movie :  गेले काही दिवस 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एक कलाकार दारीत कोसळला होता. अशा सतात्याने नकारात्मक बातम्या येत असतानाच एक सुखावणारी बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटात तुम्हा सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव दिसणार आहे.

या चित्रपटाचा पोस्टर लॉंच सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. त्यावेळी या चित्रपटातील सात मावळ्यांच्या पोषाखा वरुन त्यांच्या अवतारावरुण खूप टीका झाली. विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांचा मुलगा मावळा म्हणून शोभत नाही असेही बोलले गेले. त्याच्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका झाली. त्यानंतर बराच काळ या चित्रपटाबाबत कोणतीही अपडेट नव्हती. पण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

(after satya manjrekar exit siddharth jadhav enter in mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat movie)

नुकताच सर्वांनी पाडवा साजरा करत नवीन वर्षांचे जंगी स्वागत केले. याच गुढी पाडव्याचे औचित्य साधून अभिनेता सिद्धार्थ जाधवने काही खास फोटो शेअर केले. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात ' या चित्रपटातील अनेक कलाकार हे व्यायाम करताना दिसत आहे. यात अभिनेता हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, जय दुधाणे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह प्रवीण तरडेही पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. “गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा. आडवा होई पर्यन्त व्यायाम करून साजरा केला पाडवा…” असे कॅप्शन सिद्धार्थ जाधवने या फोटोला दिले आहे. पण हे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

कारण ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव नव्हता.. मग अचानक तो कुठून आला, का आला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शिवाय त्या फोटोत मांजरेकरांचा मुलगा सत्या कुठेच दिसत नाहीय. त्यामुळे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात सत्या ऐवजी आता सिद्धार्थ जाधव झळकणार का.. अशा चर्चांना उधाण आले आहे.

शिवाय या फोटोत अभिनेता आरोह वेलणकरचीही भर पडल्याने मांजरेकरांनी आपल्या मुलाला म्हणजेच सत्याला काढून आरोहला घेतल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अद्याप कुणीच स्पष्टता दिली नसल्याने सारेच गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

Beed Crime : बीडमध्ये वडिलांनंतर ३ वर्षीय चिमुकलीचाही संशयास्पद मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

SCROLL FOR NEXT