after shruti haasan born kamal haasan and sarika thakur get married  sakal
मनोरंजन

Shruti Haasan Birthday: आई-वडिलांच्या लग्नाआधीच झालाय श्रुतीचा जन्म.. शाळेतही जायची नाव बदलून..

कमल हसन लीव्ह इन राहत मध्ये असतानाच झाला श्रुतीचा जन्म आणि मग पुढे..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्रुती हसनचा आज वाढदिवस. श्रुतीने आजवर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बरेच काम केले. तिने बॉलीवुडमध्येही आपले नशीब आजमावले पण त्याला फारसे यश आले नाही. पण तिने तिच्या कामाने, अभिनयाने स्वतःच एक वेगळा दर्जा तयार केला आहे. अशा श्रुतीचा आज 28 जानेवारी रोजी वाढदिवस..

श्रुती हसन ही दाक्षिणात्य सुरपस्टार कमल हसन आणि अभिनेत्री सारिका ठाकूर यांची लेक. पण तिच्या जन्माचाही एक किस्साच आहे. आज श्रुतीच्या वाढदिवसाच्या त्यानिमित्ताने जाणून घेऊया काय आहे हा किस्सा..

(after shruti haasan born kamal haasan and sarika thakur get married )

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

तुम्हाला माहीत नसेल पण कमल हासन आणि त्यांची पत्नी सारिका यांनी श्रुतीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न केलं होतं. झाले असे की, कमल हासन यांनी त्यांची पहिली पत्नी वानी गनपथी यांना घटस्फोट दिला.

त्यानंतर सारिका ठाकूर यांच्याशी लग्न केलं. असं म्हणतात, 'त्याआधी कमल आणि सारिका दोघेही लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लीव्ह इन मध्ये असतानाच श्रुतीचा जन्म झाला. दरम्यान श्रुतीच्या जन्मानंतर त्यांनी लग्न केले.

श्रुती तिच्या शाळेत जाताना खरं नाव न सांगता खोट्या नावाने जात असे. शाळेत आपण एका सुपरस्टारची मुलगी आहे हे समजू नये यासाठी तिने नाव बदललं होतं. 

श्रुतीने तिच्या करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यात तिने अनेक चित्रपटांत गाणी गायली होती. वयाच्या चौथ्या वर्षी वडील कमल हासन यांच्या हे राम चित्रपटात एक लहानशी भूमिकासुद्धा साकारली होती. श्रुतीने हिंदी चित्रपटांशिवाय तेलुगु, तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

2011 मध्ये तेलगु चित्रपट 'अनागनागा ओ धीरूडू' आणि तामिळ चित्रपट  '7ओम अरिवु' साठी तिला  बेस्ट फिमेल डेब्यु साउथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर 2015 मध्ये तेलुगू चित्रपट रेस गुर्रंसाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेस साउथ हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

SCROLL FOR NEXT