मनोरंजन

सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'बिग बॉस १३'मध्ये सिद्धार्थने भाग घेतला होता आणि या सिझनचा तो विजेता ठरला होता. या सिझनमध्ये अभिनेत्री व गायिका शहनाज गिलसोबत Shehnaaz Gill सिद्धार्थची चांगली मैत्री झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. दोघांचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित झाला होता. आता सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने शूटिंग सोडलं आहे.

सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. 'सिदनाज' असा हॅशटॅग या दोघांनी तयार केला होता. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने शहनाजसोबत 'डान्स दिवाने ३' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शहनाजने सिद्धार्थसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सिद्धार्थने यावेळी माधुरी दीक्षितसोबतही स्टेजवर डान्स केला होता.

गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. कूपर हॉस्पिटलने 'पीटीआय'ला याबद्दलची माहिती दिली. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT