Shweta Tiwari Instagram
मनोरंजन

वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेताचं थिरकणं नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

'kiss My A**' गाण्याच्या डान्सिंग रील वरून अभिनेत्री पुन्हा होतेय ट्रोल

प्रणाली मोरे

नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अस्थिरतेमुळे किंवा कोणत्यातरी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी(Shweta Tiwari). तिनं आपल्या अभिनयाच्या माध्यमातनं जितकी लोकप्रियता कमावली तितकीच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही ती प्रसिद्ध झाली. पण आता पुन्हा तिनं केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे ती संकटात सापडली आहे. सोशल मीडियावर देखील तिच्याविरोधात भरपूर बोललं जात आहे. 'माझ्या ब्रा चं माप देवच घेत आहे', असं वक्तव्य करीत श्वेतानं वादात उडी मारली.अभिनेत्री श्वेता तिवारी अलिकडे 'शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर' या तिच्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये गेली होती. या प्रमोशनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्वेतानं हे वादग्रस्त वाक्य केलं .अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरावर याचे पडसाद उमटले आहेत. अगदी राजकीय गोटातूनी संताप व्यक्त केला जात आहे,तिच्याविरोधात तक्रारीचा सूर उमटला आहे. तिच्याविरोधात FIR ही दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. पण असे असतानाही तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला अनं त्यावरनं नाराज नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया देऊन तिला चांगलेच झोडपले आहे.

श्वेताने या व्हिडीओ दरम्यान एका इंग्रजी गाण्यावर बोल्ड डान्स केला आहे. या गाण्यात 'Kiss My A**' असे एक वाक्य आहे. यामध्ये ती लाल रंगाचा ड्रेस घालून बोल्ड डान्स करताना दिसत आहे. एका हॉटेलमधील कॉरिडॉरमध्ये ती डान्स करत आहे. यात तिच्यासोबत पायल सोनीही नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने याला हटके कॅप्शनही दिले आहे. '‘Morning dance with this sutli bomb'’, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. श्वेताचा हा व्हिडीओ काही मिनिटाताच व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हि़डीओ तिची मुलगी पलक तिवारी हिनेही शेअर केला आहे. श्वेता तिवारीच्या या व्हिडीओखाली ‘आम्हाला तुझी लाज वाटते’, ‘माफी माग’, ‘अटक करा’,'एफआयआर दाखल झाली आहे,तुला कळले का?" अशा विविध कमें'ट्स पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT