Vipul Amritlal Shah and Sudipto Sen Next Project Esakal
मनोरंजन

Bastar Movie: द केरळ स्टोरी नंतर पुन्हा येतयं 'बस्तर' नावाच वादळ! विपुल अमृतलाल शाह-सुदीप्तो सेनचा नवीन प्रोजेक्ट

Vaishali Patil

विपुल अमृतलाल शाह हे एक लोकप्रिय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. विपुल शाह हे 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे जास्त चर्चेत आले.

'द केरळ स्टोरी' हा वर्षीच्या सर्वात वादग्रस्त चित्रपटापैकी एक आहे. अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने इतिहास रचत बॉक्स ऑफिसवर 256 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी तर अदा शर्माही या चित्रपटात मुख्य भुमिकेत होती.


द केरळ स्टोरीच्या सुपर यशानंतर आता पुन्हा विपुल शाह आणि सुदिप्तो सेन यांची जोडी पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित चित्रपट घेवुन येत आहे.

(Vipul Amritlal Shah and Sudipto Sen Next Project)

'द केरळ स्टोरी' नंतर आता 'बस्तर' या टायटलसह पुन्हा एकदा ते एकत्र येत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा करत पोस्टरही शेयर केले आहे. शांततापूर्ण वातावरणात चित्रपटाचे शीर्षक लाल रंगात दिसत आहे. (Bastar Movie)

ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही कथा सत्य घटनेवर आधिरित असल्याच सांगण्यात येत आहे. यातही अनेक धक्कादायक खुलासे होणार असल्याचही बोललं जात आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "देशाला धक्का देणारे आणखी एक सत्य." 'बस्तर' हा सिनेमा लास्ट मंक मीडियाच्या यांच्या सहकार्याने सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा निर्मित आहे.

'बस्तर' हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल आणि कथेबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT