Best Cars Under 10 Lakh : सामान्यांच्या खिशाला परवडणारी कार घेऊन या तुमच्या घरी SAKAL
मनोरंजन

Swapnil Joshi: वाळवीनंतर स्वप्नील - शिवानी पुन्हा एकत्र, नवीन सिनेमाची घोषणा, जोडीला प्रसाद ओक

वाळवी सिनेमानंतर स्वप्नील जोशी - शिवानी सुर्वे ही जोडी आगामी मराठी सिनेमात एकत्र झळकणार आहेत

Devendra Jadhav

स्वप्नील जोशी - शिवानी सुर्वे यांचा वाळवी सिनेमा प्रचंड गाजला. वाळवी सिनेमा यावर्षी म्हणजेच २०२३ ला जानेवारी महिन्यात रिलीज झाला. सिनेमाला सुरुवातील थंड प्रतिसाद होता. पण नंतर केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमाने प्रचंड यश संपादन केलं.

वाळवी मध्ये गाजलेली जोडी म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे. आता वाळवीनंतर स्वप्नील - शिवानी नवीन सिनेमातुन एकत्र येणार आहेत. त्यांच्या जोडीला आहे प्रसाद ओक. आज या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

(after vaalvi swapnil joshi and shivani surve will seen jilbi marathi movie with prasad oak)

स्वप्नील - शिवानीची जोडी पुन्हा धम्माल करणार

स्वप्नील - शिवानी आगामी जिलबी सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जिलबी सिनेमाच्या शुटींगला आजपासुन सुरुवात झालीय. प्रसाद ओक शुटींगचा फोटो शेअर केलाय. नितीन कांबळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सिनेमात स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे यांची भुमिका नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वाळवी सिनेमात स्वप्नील आणि शिवानी या जोडीने धम्माल उडवली होती. दोघांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. आता जिलबी निमित्ताने स्वप्नील - शिवानीची जोडी पुन्हा कशी धम्माल उडवणार हे पाहायचं आहे,

लवकरच वाळवी 2 येणार

वाळवी सिनेमा इतका जबरदस्त होता की तो पाहून अनेकांचं डोकं सुन्न झालं. वाळवी सिनेमाने जे यश मिळवलं त्यामुळे निर्मात्यांनी वाळवी सिनेमाचे कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या सक्सेस पार्टीत सिनेमाचे वाळवी सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी २ ची घोषणा केली. त्यामुळे सिनेमाच्या टीमने पार्टीत एकच जल्लोष केला.


वाळवीचं यश आणि सिनेमातले कलाकार

मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत. तिसऱ्या आठवड्यात काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चे भरभरून कौतुक केले.

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT