After watching 'Animal' three times, netizens slam hemangi kavi actress reply viral  SAKAL
मनोरंजन

Animal Movie: तीन वेळा 'अ‍ॅनिमल' पाहिल्याने नेटकऱ्यांनी सुनावले! हेमांगी सणसणीत उत्तर देत म्हणाली, "तुम्ही फक्त..."

'अ‍ॅनिमल' पाहायला गेलेल्या हेमांगीला नेटकऱ्यांनी सुनावले. हेमांगीनेही त्यांना परखड शब्दात उत्तर दिलंय

Devendra Jadhav

Hemangi kavi on Animal Movie: सध्या रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ने जगभरात ४०० कोटींची कमाई केलीय. रणबीर कपूरने सिनेमात प्रमुख भूमिका साकारलीय.

'अ‍ॅनिमल' सिनेमावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना सिनेमा आवडतोय तर अनेक लोकं सिनेमावर टिका करत आहेत.

अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने 'अ‍ॅनिमल' सिनेमा तीन वेळा थिएटरमध्ये पाहिलाय. त्यामुळे तिच्यावर काही लोकांनी नाराजी व्यक्त केलीय. पण हेमांगीने दिलेल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद झालीय.

'अ‍ॅनिमल' पाहिल्याने नेटकरी नाराज! हेमांगी म्हणाली...

काही दिवसांपुर्वी हेमांगीने तीन वेळी 'अ‍ॅनिमल' सिनेमा पाहिल्याचं सांगितलं होतं. त्याखाली एकाने कमेंट केली की, "झिम्मा 2 किती वेळा बघितलंस!"

यावर रिप्लाय करताना हेमांगी म्हणाली, "मी निदान पाहिला तरी! आपण ना फक्त तुलनाच करत बसणार आहोत. तरीही मला सांगायला आवडेल. सैराट ६ वेळा.. धर्मवीर ४ वेळा.. घर बंदूक बिर्याणी ३ वेळा.. कोर्ट ३ वेळा.. बापजन्म २ वेळा.. नदी वाहते ३ वेळा... आणि हो सगळे थिएटरमध्ये पाहिले. आणि त्यावर पोस्ट पण टाकल्या.. ही तुलना बंद करुन आपलं बॉक्स ऑफीस कलेक्शन छान कसं होईल यावर लक्ष द्यायला पाहिजे.."

'अ‍ॅनिमल' ची विक्रमी बॉक्स ऑफीस

'अ‍ॅनिमल' सिनेमाने Sacknilk रिपोर्टनुसार, रिलीजच्या सातव्या दिवशी 25.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसह अ‍ॅनिमल'ने एकूण सात दिवसात 338.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'अ‍ॅनिमल' ची तगडी स्टारकास्ट

'अ‍ॅनिमल' सिनेमाने संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

यात रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ति डिमरी आणि अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT