ranveer singh 
मनोरंजन

दीपिकानंतर आता रणवीर बनला शेफ..केक बनवतानाचा 'हा' व्हिडिओ पाहाच..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊन म्हणजे कलाकारांना आपल्या कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवण्याची मिळालेली सुवर्णसंधीच आहे. अहो आता हेच बघा ना...सतत वर्ल्ड टूर, चित्रीकरणामध्ये सुरु असलेली धावपळ, प्रत्येक भूमिकेची तयारी यामध्येच कलाकार व्यस्त असतो. कामाच्या गडबडीत कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही ही नेहमीची गोड तक्रार कलाकारांची असते. पण आता चित्र काही उलट आहे. आता कोणी कलाकार घराची साफसफाई करत आहे, कोणी भांडी घासत आहे, काहींनी तर चक्क स्वयंपाक घराचा ताबा घेतला आहे. बॉलिवूडमधील असंच एक टॉक ऑफ द टाऊन कपल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं आहे. आणि ते कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 

रणवीर दीपिकासाठी चक्क शेफ बनला आहे. त्याचा स्वयंपाकघरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकासाठी तो पॅनकेक बनवत आहे. अगदी शेफचा वेशही त्याने परिधान केला आहे. दीपिकासाठी पॅनकेक बनवण्यात मग्न असणारा रणवीर नवनवीन रेसिपीही शिकत आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा तो पुरेपुर उपयोग करत आहे असे म्हणायला हरकत नाही.

दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी हिट झाली. तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांची रिअल लाईफ केमिस्ट्री हिट आहे. सोशल मीडियाद्वारे हे दोघं नेहमीच एकमेकांवरील प्रेम खुलेपणाने व्यक्त करत असतात. बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्येही रणवीरने दीपिकावर असणारं आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यादरम्यान दोघंही भावूक होताना दिसले. आता चित्रीकरणामधून दोघांनाही मिळालेला हा क्वालिटी टाईम आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिका-रणवीरने त्यांचा एक एकत्रित फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आणि यो फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली. तसेच दीपिकाही या क्वारंटाईन वेळात आपले आवडते छंद जोपासत आहे.  

after wifey deepika padukon ranveer singh turns chef bakes chocolate cake  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT