Ahead Of Karnataka Polls, actor Kiccha Sudeep To Join BJP Today  sakal
मनोरंजन

Kiccha Sudeep: हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून नाकारणारा अभिनेता किच्चा सुदीप भाजपमध्ये!

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपमध्ये प्रवेश..

नीलेश अडसूळ

Kiccha Sudeep : किच्चा सुदीप हे नाव आपल्याला काही नवीन नाही. त्याच्या अभिनयाने तर तो आपल्यापर्यंत पोहोचलाच. पण मध्यंतरी झालेल्या राष्ट्रभाषेवरील वादामुळे तो अधिकच चर्चेत आला. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही या त्याच्या एका विधानाने संपूर्ण बॉलीवुड आणि टॉलीवुड रिंगणात उतरले होते. आज किच्चा सुदीपबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. किच्चा आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Election) बिगुल वाजलेले आहे. यामध्ये भापजही शड्डू ठोकून उतरला आहे. कर्नाटकात याधीही भाजपची सत्ता होती. त्यामुळे यंदाही भाजप कर्नाटक आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आता निवडणुका म्हंटलं की स्टार प्रचारक हे आलेच. बरेच कलाकार पक्षाचा प्रचार करण्यासाठी येत असतात. यंदा कर्नाटकात भाजपचा प्रचंड कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

'किच्चा' सुदीपने मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, आज गुरुवारी तो भाजप पक्षात प्रवेश करून याबाबत घोषणा करेन अशी दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT