Gulshan Grover
Gulshan Grover Google
मनोरंजन

बॅडमॅनला पाहून घाबरली होती एअर होस्टेस

प्रणाली मोरे

गुलशन ग्रोव्हर(Gulshan Grover) म्हणजे बॉलीवूडचे 'बॅडमॅन'...ही त्यांची ओळख बनलेली. अर्थात सिनेमांमधनं नकारात्मक भूमिका केल्यामुळे त्यांच्या वाट्याला असे काही सीन आले की जे पडद्यावर पाहून त्यांची भयंकर चीड यायची. स्त्री वर्गात तर त्यांची जास्तच दहशत. गुलशन ग्रोव्हर यांनी या दहशतीचा कसा त्रास व्हायचा याबद्दलचा एक कीस्सा एका मुलाखतीत शेअर केलाय. ते म्हणाले,"नकारात्मक भूमिका करताना सिनेमांमधनं हिरोचा मार खावा लागायचा,हिरॉइनचा द्वेष सहन करावा लागायचा इतपत ठीक होतं पण प्रत्यक्षातही सर्वसामान्य आयुष्य जगताना लोकांच्या रागाचा सामना करावा लागयचा हे फार भयंकर होतं. ब-याचदा त्यामुळे खूप त्रासही सहन काराव लागलाय."

पुढे त्यांनी जो किस्सा सांगितलाय तो मजेशीर आहे. ते म्हणाले,''एकदा मला अचानक फ्लाइटनं बाहेर जायचं होतं. बुकिंग नव्हतं पण आयत्यावेळेला गेल्यावर एकदम शेवटच्या सीटची तिकीट मिळाली. खरंतर त्या सीटवर एक सीट एअरहोस्टेससाठी राखीव असते. मी त्या सीटवर जाऊन बसलो पण तिथे एअरहोस्टेस आली आणि मला पहाताच तडक निघून गेली. मला आतून हसायचा आवाज आला,तेव्हा फ्लाइट टेकऑफ करायला उशीर का होतोय असा प्रश्न मी केला असता दुसरा फ्लाइट अटेंडंट आला आणि म्हणाला,'सर आमची एअरहोस्टेस तुम्हाला घाबरलीय आणि तुमच्या बाजूला बसणार नाही असं म्हणतेयट. हे ऐकून काय बोलावं हेच मला सुचेना. अर्थात तोपर्यंत फ्लाइट टेकऑफ व्हायला ऑलरेडी उशीर झाला होता. आणि मलाही असे अनुभव वेगळ्या पद्धतीनं आले होते म्हणून मी गप्प बसलो काही प्रतिक्रिया त्यावर दिली नाही''.

'राम लखन','अवतार','हेराफेरी','गॅंगस्टार' या आणि अशा अनेक सिनेमांतून गुलशन ग्रोव्हर यांनी काम केलंय. नुकतेच ते आपल्याला अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' सिनेमात दिसले होते. जीमी शेरगिलसोबत 'युअर हॉनर' या वेबसिरीजमध्येही त्यांनी काम केलंय. याच मुलाखतीत पुढे सांगताना जुन्या काळातले अजित आणि अमरीश पुरी या खलनायक साकारणा-या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्यांची आठवण त्यांनी काढली. ते म्हणाले,''या दोन खलनायकांची ओळख हिरोच्या बरोबरीने सिनेमातनं व्हायची. ते पडद्यावर आले की हिरोइतक्याच त्यांना शिट्टया,टाळया पडायच्या. पुन्हा असे खलनायक होणे नाही''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT