aishwarya aaradhya 
मनोरंजन

ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या रुग्णालयातून घरी परतल्या

संतोष भिंगार्डे

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन आणि आराध्या यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याबाबत काहीही समजलेले नाही. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच तेदेखील घरी परतण्याची शक्यता आहे.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यामुळे त्यांना विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते. ११ जुलै रोजी अमिताभ आणि अभिषेक बच्चनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चारेक दिवसांनी ऐश्रर्या आणि आराध्याला दाखल करण्यात आले.  

ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्या दोघीही जलसा बंगल्यावर पोहोचल्या आहेत. अभिषेक बच्चनने ट्विटरवर सांगितले, की आम्ही रुग्णालयात आहोत. आमची प्रकृती सुधारत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या घरी पोहोचल्या आहेत. 

अभिषेक बच्चनने ट्विटरवर सांगितले, की तुम्ही सतत करीत असलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी तुमचा कायमचा ऋणी राहीन. ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. मी आणि माझे वडील आम्ही रुग्णालयात उपचार घेत आहोत. 

संपादन : दिपाली राणे-म्हात्रे

aishwarya and aaradhya bachchan discharged from nanavati hospital  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT