Aishwarya Avinash Narkar Marathi celebrity dance video esakal
मनोरंजन

Aishwarya Narkar Dance: 'असं नाचता यायला पाहिजे!' ऐश्वर्या- अविनाश नारकर यांचा डान्स पाहून व्हाल फिदा!

इंस्टावर ऐश्वर्या नारकर यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

युगंधर ताजणे

Aishwarya Avinash Narkar Marathi celebrity dance video : मराठी मनोरंजन विश्वात असे काही सेलिब्रेटी आहेत जे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असतो. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची गोष्टच वेगळी आहे.

तुम्ही जर या दोन्ही सेलिब्रेटींच्या इंस्टा अकाउंटवर गेलात तर तुम्हाला त्यांनी केलेली कमाल, धमाल दिसून येईल. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपण किती फिट आणि एनर्जीटीक आहोत हे या दोन्ही सेलिब्रेटींनी दाखवून दिले आहे. यात ऐश्वर्याजींचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. इंस्टावर ऐश्वर्या नारकर यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सध्या ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यात हे दोन्ही सेलिब्रेटी धमाल डान्स करताना दिसत आहेत. तो डान्स पाहून त्यांना नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत. काहींनी तर या वयातही असा डान्स करता येणं जमलं पाहिजे असं म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. काहींनी या जोडीची खूप स्तुतीही केली आहे.

ऐश्वर्याजी तुम्ही नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत त्यांना प्रेरणा देता अशा काही चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अविनाश नारकर यांनी देखील यापूर्वी वेगवेगळे व्हिडिओ शेयर करुन आपल्यातील नृत्यकौशल्याचा परिचय चाहत्यांना करुन दिला आहे. त्यातील त्यांची एनर्जी आणि एक्सप्रेशन्स हे चाहत्यांना थक्क करणारे आहेत. काहींनी तर या दोन्ही सेलिब्रेटींच्या वयाचा उल्लेख करुन त्यांनी यानिमित्तानं तरुणांना मोठी प्रेरणा दिली आहे. असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर मराठी सेलिब्रेटींचा चांगलाच बोलबाला आहे. त्यातून त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. अशातच काही सेलिब्रेटींच्या पोस्टला चाहत्यांकडून मिळणारी कौतुकाची थाप खास चर्चेचा विषय असते. त्यात ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT