Aishwarya Bhaskaran  Instagram
मनोरंजन

Tollywood: सोशल मीडियावर नंबर शेअर करणं साऊथ अभिनेत्रीला पडलं महाग.. आता त्या नंबरवर नको-नको त्या गोष्टी पाठवतायत लोक

साऊथ इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या भास्करननं युट्युब व्हिडीओ शेअर करत काही लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

प्रणाली मोरे

Aishwarya Bhaskaran : साऊथ इंडियन अभिनेत्री ऐश्वर्या भास्करनं युट्युब व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती काही लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप करताना दिसत आहे. ऐश्वर्या तिच्या दाक्षिणात्य भाषेत आपल्या सोबत घडलेल्या घटनेचा वृ्त्तांत सांगताना दिसत आहे.

ऐश्वर्या म्हणतेय की,तिच्या मुलीनं तिला हा व्हिडीओ करण्यास सांगितल्यानं ती असं करत आहे. ती पुढे म्हणाली,''तिच्यासोबत जे काही घडतंय ते बंद नाही झालं तर ती त्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल''.(Aishwarya bhaskaran south indian actress sexual harassment reveals her pain in youtube video)

ऐश्वर्या भास्करनं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की लोक तिची पोस्ट पाहून खूप गलिच्छ कमेंट करत आहेत. एकानं तर चक्क प्रायव्हेट पार्टचा फोटो देखील पाठवला आहे. ऐश्वर्या म्हणाली की तिनं या प्रकरणात आपल्या मुलीशी बातचीत केली आणि तिनं दिलेल्या सल्ल्यावर तिनं युट्युबवर व्हिडीओ पोस्ट करत आपला मुद्दा मांडला आहे.

माहितीसाठी सांगतो की ऐश्वर्या भास्करन साऊथच्या सिनेमांचा एक ओळखीचा चेहरा आहे. पण मग तिला सोशल मीडियावर ट्रोल का केलं जात आहे?

माहिती समोर येत आहे की, ऐश्वर्या भास्करनने काही दिवसांपूर्वी साबण कंपनी सुरू केली होती. ऐश्वर्यानं या नव्या व्यवसाया संबंधी लोकांशी कनेक्ट होण्यासाठी आपला मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला आणि तिथूनच खऱ्या अडचणी सुरू झाल्या.

लोकांनी ऐश्वर्याच्या नंबरवर अश्लील फोटो आणि गलिच्छ शब्दातील मेसेज पाठवायला सुरुवात केली. ऐश्वर्या म्हणाली की,''तिला याबाबतीत सध्या तरी सायबर पोलिसांची मदत घ्यायची नाही. पण जर असेच मेसेज यायला लागले तर मला कायद्याची मदत घ्यावीच लागेल''.

ऐश्वर्या भास्करन साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी हिची मुलगी आहे. ऐश्वर्यानं 'इजमान' आणि 'आरू' तसंच 'पंचतंथिरम' सिनेमांतून काम केलं आहे. मोठ्या पडद्यावर बऱ्यापैकी नाव कमावल्यावर ती आता व्यावसायिक क्षेत्रात आली आहे.

सुरुवातीला तिनं दुसऱ्या अभिनेत्रींसोबत मिळून 'साउंड सरोजा' नावाचं युट्युब चॅनेल सुरूकेलं. काही कारणानं ते बंद झालं. आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिनं 'मल्टी मॉम' नावाचं चॅनेल सुरू केलं आहे. ज्यावर ती वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT