Aishwarya Narkar Workout Video Instagram
मनोरंजन

Aishwarya Narkar video: वयाच्या पन्नाशीत कशी राहते ऐश्वर्या नारकर इतकी फिट?, व्हिडीओतून ओपन केलं सीक्रेट

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमी तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करते आणि चाहत्यांना प्रोत्साहन देताना दिसते.

प्रणाली मोरे

Aishwarya Narkar Workout video: ऐश्वर्या नारकर ही मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री..अर्थात तिनं हिंदी मालिकाही गाजवल्या आहेत बरं का. गेल्या अनेक वर्षांपासनं इंडस्ट्रीत काम करुन जसा तिचा अभिनय बहरत गेला अगदी तसंच तिचं व्यक्तिमत्त्वही. ऐश्वर्या नारकर मराठीतली एक अशी अभिनेत्री आहे जिनं वयाच्या पन्नाशीतही स्वतःला खूप फिट ठेवलं आहे. अर्थात मराठीत अशा फिट अभिनेत्री मोजक्याच,म्हणजे पन्नाशी गाठलेल्या म्हणतोय बरं का आम्ही. ऐश्वर्या सोशल मीडियावरही अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिटनेस राखण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसते.

ऐश्वर्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारतेय. मालिकेचं शूटिंग म्हटलं की कमालीचं व्यस्त शेड्युल पण अशातही ऐश्वर्या वर्कआऊटसाठी पुरेसा वेळ काढून वर्कआऊट करताना दिसते. सध्या तिच्या वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. कारण वयाची पन्नाशी ओलांडूनही ती ज्या पद्धतीनं कठीण वर्कआऊट करताना त्या व्हिडीओत दिसत आहे ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटेल.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

ऐश्वर्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे आणि आपल्या या लाडक्या अभिनेत्रीप्रमाणे वर्कआऊट करून फिट राहण्याचं वचनही काहींनी दिलं आहे. ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत खलनायिका रंगवतेय. अर्थात तिच्या चेहऱ्यावरील गोडवा ही भूमिका साकारताना तिला कसरत करायला लावत असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: ५५ हजार ९६९ कोटींचे सामंजस्य करार, अर्थव्यवस्थेला बळ मिळणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Ranji Trophy: महाराष्ट्राचा मोठा विजय! पृथ्वी शॉच्या द्विशतकानंतर मुकेश चौधरी अन् रामकृष्ण घोषचा चंदिगढविरुद्ध तिखट मारा

Renault Duster: डस्टर येतेय! दमदार फिचर.. आयकॉनिक 'एसयूव्ही'ची प्रतीक्षा संपली; तारीखही झाली फायनल

Mumbai News: पुनर्विकासातून ६ लाख नवीन घरे! म्हाडा उपाध्यक्षांची माहिती; जपानच्या शिष्टमंडळाची मुख्यालयास भेट

Latest Marathi News Live Update : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT