Aishwarya Rai Bacchan daughter Aaradhya video viral  esakal
मनोरंजन

Aishwarya Rai : 'मॅडम तुमच्या एकटीचा फोटो हवाय, मुलीचा नको!' ऐश्वर्यानं पापाराझ्झींना दिलं कडक उत्तर

यासगळ्यात माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय आणि तिची लेक या चर्चेत आल्या आहेत.

युगंधर ताजणे

Aishwarya Rai Bacchan daughter Aaradhya video : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या उद्धघाटनप्रसंगी बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून या सोहळ्याच्या फोटोंनी, व्हिडिओंनी चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात रेखापासून रणवीर सिंगपर्यत सर्वच सेलिब्रेटी सहभागी झाले होते. साऊथच्या रश्मिकानं परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

यासगळ्यात माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय आणि तिची लेक या चर्चेत आल्या आहेत. यापूर्वी ऐश्वर्या आणि सलमान खान हे वीस वर्षानंतर फोटोसाठी एकत्र आल्याचे दिसून आले आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.यापूर्वी देखील एका लग्न समारंभामध्ये ऐश्वर्या आणि सलमान एकत्र आले होते. त्यात आणखी भर म्हणजे रेखानं देखील ऐश्वर्या, तिची लेक यांच्यासोबत फोटो शेयर केला आहे.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या फोटोंना नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अशातच या कार्यक्रमातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऐश्वर्याला फोटोसाठी पोज देण्याची विनंती फोटोग्राफर्स करत आहे. मॅडम आम्हाला तुमचा सोलो फोटो हवा आहे. अशी मागणी फोटोग्राफर्सकडून होत असताना ऐश्वर्याची लेक आराध्या काहीशी भांबावते. मात्र त्याचवेळी ऐश्वर्यानं फोटोग्राफर्सला विनंती करुन आराध्यासोबतच फोटो घेणे पसंत केले.

तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचे कौतूक केले आहे. तसंही हल्ला ऐश्वर्या बॉलीवूडशी संबंधित कोणताही कार्यक्रम असल्यास आराध्याला सोबत घेऊन जायला विसरत नाही. त्यांचे फोटो हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या उद्घघाटनचे फोटो आणि त्याला बॉलीवूड सेलिब्रेटींनी केलेली गर्दी हे सगळं काही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT