Aishwarya Rai-Bachchan And Aardhya Bachchan Photo trolled, Aardhya birthday photo Instagram
मनोरंजन

Aishwarya Rai: सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या एका फोटोवरनं खळबळ, थेट अभिनेत्रीला संस्कार शिकवू लागले लोक

ऐश्वर्या राय-बच्चनची मुलगी आराध्या बच्चन हिचा आज ११ वा वाढदिवस आहे. त्या बर्थ डे सेलिब्रेशनमधील एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.

प्रणाली मोरे

Aishwarya Rai-Bachchan: बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सौंदर्यासोबतच, आपल्या सिनेमातील भूमिकांमुळे देखील चर्चेत पहायला मिळते. पण सध्या तिला एका फोटोमुळे जोरदार ट्रोल केलं जात आहे. एकीकडे काही नेटकरी ऐश्वर्याच्या त्या फोटोला खूप सुंदर आणि क्युट फोटो म्हणताना दिसत आहेत तर दुसरीकडे काही नेटकरी ऐश्वर्याला संस्कारांची शिकवण देताना दिसत आहेत.(Aishwarya Rai-Bachchan And Aardhya Bachchan Photo trolled, Aardhya birthday photo)

ऐश्वर्या राय बच्चनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर मात्र वादात पडला आहे. त्याचं झालं असं की आज १६ नोव्हेंबर ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या बच्चन हिचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीनं रात्री १२ वाजता मुलीसोबत केलेल्या सेलिब्रेशनचा एक फोटो पोस्ट केला.

फोटोत ऐश्वर्या राय बच्चन मुलीचा ११ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तिनं आपल्या मुलीला त्या फोटोत लीप किस दिलेलं दिसत आहे. फोटो शेअर करत तिनं लिहिलं आहे-''माय लव्ह,माय लाईफ..माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,माझी आराध्या...'' ऐश्वर्या राय बच्चनच्या या फोटोवर आता नेटकऱ्यांनी हंगामा सुरु केला आहे.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सोशल मीडियावर एकीकडे लोक आई-मुलीच्या प्रेमाची दृष्ट काढताना दिसत आहेत. त्यांची मोठ्या मनानं प्रशंसा करताना दिसत आहेत तर काही लोक मात्र ऐश्वर्याला संस्कारांचे धडे देताना दिसत आहेत. ऐश्वर्याला ट्रोल करत लोक म्हणताना दिसत आहेत की आपल्या मुला-मुलीच्या ओठांवर किस करणं ही कुठली संस्कृती.

हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'तु मुलीवर प्रेम करतेस इथपर्यंत ठीक आहे, पण असा फोटो सोशल मीडियावर शेअर करु नये'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT