Aaradhya bachchan  Esakal
मनोरंजन

Aaradhya Bachchan Video: अखेर ऐश्वर्याच्या लेकीनं हेअरस्टाईल बदलली! नेटकरी काय म्हणतील भरोसा नाय!

आराध्या बच्चनचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

Vaishali Patil

Aishwarya Rai Bachchan Doughter Aaradhya Bachchan Video: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारंभ सोहळा नुकताच झाला. यावेळी बऱ्याच स्टारकिड्सने स्टेजवर परफॉर्म केले. सध्या सोशल मिडियावर स्टारकिड्सचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

यातच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

ज्यात आराध्याने अभिनय केला आहे. यावेळी आराध्या वेगळ्या लूकमध्ये दिसली. आराध्या स्टेजवर बदललेल्या हेयर स्टाईलसह मेकअपमध्ये दिसली.

यादरम्यान तिचा लुक पूर्णपणे बदललेला दिसत आहे. स्टेजवर इंग्रजीत अभिनय करणाऱ्या आराध्याने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत तिला ओळखणेही कठीण झाले होते.

आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर तिने केलेल्या अभिनयाचे सर्वच नेटकरी कौतुक करत आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदा ऐश्वर्यांच्या लेकीचा पुर्ण चेहरा दिसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आराध्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एकानं लिहिले की, "शेवटी आम्हाला आराध्याचा चेहरा पाहायला मिळाला." तर दुसर्‍याने लिहिले, “आराध्याची हेअरस्टाइल करणाऱ्याला एक पुरस्कार द्या”

शाळेच्या वार्षिक दिनानिमित्त आराध्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व बच्चन कुटुंब एकत्र आले. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन एकत्र स्पॉट झाले होते. ऐश्वर्या रायने तिच्या लेकीचा परफॉर्म मोबाईलमध्ये शुट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT