Aishwarya rai,Alia Bhatt Google
मनोरंजन

Viral Video: आलिया भट्ट आणि नेपोटिझमवर ऐश्वर्यानं साधला निशाणा अन् पब्लिक झालं खूश

ऐश्वर्या राय बच्चनचा नेपोटिझमवर भाष्य करतानाचा पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात ती आलिया भट्ट विषयी बोलताना दिसत आहे. व्हिडीओ जवळपास पाच वर्ष जुना आहे. जेव्हा ऐश्वर्या राय आपला सिनेमा 'फन्ने खान'चं प्रमोशन करत होती. आणि त्या दरम्यान तिनं एका मुलाखतीत नेपोटिझम विषयी भाष्य करताना आलिया आणि करण जोहरचा उल्लेख केला होता.

व्हायरल व्हिडीओत ऐश्वर्या राय बच्चन म्हणताना दिसत आहे,''मी हे आलिया भट्टला देखील म्हणाले होते की ही गोष्ट तुझ्यासाठी खूप चांगली आहे. ज्या पद्धतीचा पाठिंबा तुला करण जोहरनं आधीपासून दिला आहे, त्यामुळे तुला आता कोणतीच गोष्ट अशक्य,कठीण वाटत नसेल''.(Aishwarya Rai Bachchan on alia bhatt and nepotism)

ऐश्वर्या राय व्हिडीओत म्हणताना दिसत आहे की, आलियाला खूप संधी चालून आल्या. पण ही गोष्ट देखील तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती की, आलिया खूप छान काम करतेय,मिळणाऱ्या संधीचं सोनं करतेय हे विसरून चालणार नाही. आणि यामुळेच तिला एकापाठोपाठ एक चांगली कामं मिळत आहेत.

अशा पद्धतीनं नेपोटिझमवर मोकळेपणानं भाष्य केल्यामुळे ऐश्वर्या रायचे चाहते मात्र तिच्यावर खूप खूश आहेत. कितीतरी नेटकऱ्यांना ऐश्वर्या रायचा हा अंदाज आवडल्याचं दिसत आहे.

राहुल चंदन नावाच्या एका नेटकऱ्यांन व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,'जेव्हा ऐश्वर्या राय बच्चननं आलिया भट्टला नेपोटिझमवरनं सुनावलं..'

तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,' ऐश्वर्या खरं बोलतेय..आणि ती एक अशी अभिनेत्री आहे जिनं मिस वर्ल्ड सारखी मोठी स्पर्धा जिंकूनही खूप मोठा संघर्ष केला'.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,' ऐश्वर्या रायला अभिनेत्री म्हणून आपलं नाव कमवायला खूप वेळ लागला पण आलियाच्या बाबतीत हे खूप सहज घडलं. ती फक्त तो फरक सांगतेय..आलियाला सुनावत नाही ना नेपोटिझमचा मुद्दा मोठा करतेय'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT