Aishwarya Rai birthday
Aishwarya Rai birthday esakal
मनोरंजन

Aishwarya Rai birthday: 'पत्रकार आहेस शिस्तीत राहा'! 'तो' प्रश्न ऐश्वर्याला राग अनावर

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Rai Birthday: विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय ही तिच्या हटक्या स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. परखड स्वभावासाठी आणि सडेतोड बोलण्यासाठी देखील ऐश्वर्याकडे पाहिले जाते. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ऐश्वर्या ही बॉलीवूडमध्ये चमकताना दिसते आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही कमालीचा आहे. काही दिवसांपूर्वी मणिरत्नम दिग्दर्शित पीएस 1 या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात ऐश्वर्या लीड रोलमध्ये होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली होती. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे.

ऐश्वर्यानं अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. संजय दत्त सोबत शब्दमध्ये, ऋतिक रोशनसोबत धुम 2 मध्ये तर दिल है मुश्किलमध्ये देखील बोल्ड अंदाजात ती दिसली होती. त्यानंतर मात्र तिचे इंटिमेट सीन कमी झाले. एका पत्रकारानं तिला त्यावरुन विचारणा केली होती. तुमच्या चित्रपटात तुम्ही इंटिमेट सीन फारसे देत नाही यामागील कारण काय, असा प्रश्न त्या पत्रकारानं ऐश्वर्याला विचारला होता. तो प्रश्न ऐकून ती चांगलीच संतापली होती.

ऐश्वर्यानं त्या पत्रकाराला चांगलेच झापले होते. तुम्ही पत्रकार आहात हे विसरु नका. गायनेलॉजिस्ट नाही. आम्ही काय करायचे काय नाही हे तुम्ही विचारु नका. मला इंटिमेट सीन करावेसे वाटत नाही याचे काही खास कारण नाही. त्यामुळे तो प्रश्न विचारुन उगाचच वाद निर्माण करु नका. असे तिनं सांगितले. मात्र त्या पत्रकारानं पुन्हा त्याच प्रश्नावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. मग ऐश्वर्याचा संयम सुटला तिनं त्याला चांगलेच सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT