ponniyin selvan 2 Sakal
मनोरंजन

PS 2 Box Office: ऐश्वर्या रायच्या 'पोनियिन सेल्वन 2' ची गरुड झेप! 3 दिवसातच पार केला इतक्या कोटींचा टप्पा

Vaishali Patil

Ponniyan Selvan चा पहिला भाग म्हणजेच PS-1हा 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. PS-2 बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ तर होतीच. यामध्ये चोल राजवटीची कहाणी पुढे नेण्यात आली असून विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज आणि विक्रम प्रभू यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या रायचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या लूकपासून त्याच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. असो, ऐश्वर्या बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसली त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील खुप उत्सूकता होती.

त्यामुळे रिलिज होताच 'Ponniyin Selvan 2' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याने शानदार ओपनिंग घेतली. तर दुसरीकडे, वीकेंडलाही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने चांगलीच कमाई झाली, त्यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाला.

'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट लवकरच नवीन विक्रम तयार करेल असं काहीस चित्र दिसत आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

'पोनियिन सेल्वन 2' हा चित्रपट 3200 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला. 'पोनीयिन सेल्वन 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 24 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने २६.२ कोटींची कमाई केली. त्याच वेळी, 'पोनियिन सेल्वन 2' च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे देखील चांगले आले आहेत.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Ponniyin Selvan 2' ने रविवारी म्हणजेच रिलीजच्या तिसर्‍या दिवशी 30 कोटींचं कलेक्शन केले. यासह चित्रपटाची एकूण कमाई 80.20 कोटींवर गेली आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल असं काहीस चित्र दिसत आहे.

तर PS 2 ने रिलीजच्या अवघ्या 3 दिवसात जगभरात एकूण 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारताशिवाय इतर देशांमध्येही या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. जगभरात या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT