Aishwarya Shete 
मनोरंजन

Sakal Unplugged With Aishwarya Shete : 85 किलो वजन, ट्रोलिंग अन् आईचं स्वप्न; भिवंडीच्या अभिनेत्रीचा प्रेरणादायी प्रवास..!

Aishwarya Shete: ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतील मुख्य कलाकार हा प्रवास कसा होता? तिच्या खऱ्या आयुष्यात कुणी राघव आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिने Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये ऐश्वर्यानं दिली आहेत.

priyanka kulkarni

Aishwarya Shete: छोट्या पडद्यावरील 'रमा राघव' (Rama Raghav) या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) मूळची भिवंडीची (Bhiwandi) आहे. ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतील मुख्य कलाकार हा प्रवास कसा होता ? तिच्या खऱ्या आयुष्यात कुणी राघव आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिने Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये ऐश्वर्यानं दिली आहेत.

अलीकडच्या काळात कलर्स मराठी वरील रमा राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील रमा हे पात्र प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. रमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. प्रेक्षकांमध्ये सुद्धा तिची चर्चा पाहायला मिळते.

ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतील मुख्य भूमिका इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. ऐश्वर्या सांगते, "मी लहान असताना बहिणीच्या शिक्षणासाठी आम्ही भिवंडी वरून कल्याण येथे राहण्यासाठी आलो. या काळात माझे नवीन मित्र होत नव्हते. मला बोलण्याची आवड नव्हती. परंतु 'पछाडलेला ' हा माझा सर्वाधिक आवडीचा चित्रपट होता. यातील वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेची नक्कल आरशासमोर करायचे. माझ्यातील अभिनेत्री आईला जाणवली आणि पुढे माझ्या आईने मला या क्षेत्रात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. सुरुवातीच्या काळात माझं वजन 85 किलो होतं. मी माझ्या जाड दिसण्यामुळे मला नर्वस वाटत होते. यासाठी मला बऱ्याच लोकांनी सकारात्मक प्रोत्साहन दिलं. माझ्या आईने माझी विशेष काळजी घेतली.मी सुद्धा स्वतःकडे लक्ष दिलं.माझी मुलगी एक दिवस मुख्य भूमिकेत असेल हे माझ्या आईचं स्वप्न होतं. त्यावर काम केलं आणि आज तिचे स्वप्न मी पूर्ण करू शकले, याचा आनंद आहे."

'रमा' या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी मला सहज स्वीकारलं नाही: ऐश्वर्या शेटे

रमा ही व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर रमा या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी मला सहज स्वीकारलं नाही. ही अभिनेत्री, ही अभिनेत्री कशी असू शकते? अशा देखील प्रतिक्रिया आल्या. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता पण स्वतःला सिद्ध केलं. काम करत राहिले आणि आज प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.", असं ऐश्वर्या म्हणाली.

ऐश्वर्या म्हणते, "ट्रोलिंगला मी आता भाव देत नाही"

"सोशल मीडिया ट्रोलिंगला मी आता भाव देत नाही.त्या प्रतिक्रियांमधून स्वतःला सुधारता येतं का, याचा विचार करत पुढे जाते."तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि भविष्यात मोठ्या पडद्यावर कोणत्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडेल , या सगळ्यावर तिने खास गप्पा मारल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ही मुलाखत जरूर ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मतमोजणी सुरू... नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकीत लोकांचा उत्साह, प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

SCROLL FOR NEXT