ajay 
मनोरंजन

अजय देवगणची मुलगी न्यासाला कोरोनाची लागण? समोर आली अजयची ही रिएक्शन.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..एकीकडे या कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सगळेच कलाकार आयसोलेशनमध्ये आहेत.. तर दुसरीकडे अभिनेता अजय देवगणची पत्नी अभिनेत्री काजोल आणि मुलगी न्यासाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याच्या अफवा सगळीकडे पसरत आहेत..यावरंच आजय देवगणने सोशल मिडियावर खुलासा केला आहे..

अजय देवगणने पत्नी काजोल आणि मुलगी न्यासाला कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीचं खंडन केलंय..अजय देवगणने सोशल मिडियावर दोघीही ठीक असल्याचं सांगितलंय...अजयने याबाबत अधिक खुलासा करत ट्वीट केलंय..

अजयने हे ट्वीट करत म्हटलंय, 'विचारपुस करण्याासाठी धन्यवाद..काजोल आणि न्यासा एकदम व्यवस्थित आहेत..त्यांच्या आरोग्याबाबतच्या सगळ्या अफवा निरर्थक आहेत..'
खरंतर न्यूजट्रॅकच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला होता की, अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासामध्ये कोरोना व्हायरची लक्षणं दिसल्यानंतर तिचं निरीक्षण केलं गेलं होतं या निरीक्षणामध्ये ती पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आल्याचं म्हटलंय..मात्र यावरंच आता अजय देवगणने खुलासा केला असून काजोल आणि न्यासा दोघीही
कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे..

अजय देवगणच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर अजय त्याच्या आगामी सुर्यवंशी सिनेमात दिसणार आहे..हा सिनेमा २४ मार्चला रिलीज होणार होता..मात्र कोरोनाच्या संकटामुळे या सिनेमाची तारीख पुढे ढकलली आहे..या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं असून अजयसोबत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग देखील दिसून येणार आहेत..

ajay devgan on the rumor of kajol and nishas infection said he is all right 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT