ajay devgan, tabu, ajay devgan - tabu new movie, auron mein kaha dum tha SAKAL
मनोरंजन

Auron Mein Kahan Dum Tha: दृश्यम, भोला नंतर अजय देवगण - तब्बू पुन्हा एकत्र.. नवीन सिनेमाची घोषणा

तब्बू आणि अजय देवगण यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत

Devendra Jadhav

Ajay Devgan - Tabbu New Movie: अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी सध्या प्रचंड धुमाकूळ घालतेय. तरुण कलाकारांना लाजवेल अशी या दोघांची केमिस्ट्री आहे. दृश्यम पासून तब्बू आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधले प्रत्येक सिनेमे सुपरहिट करत आहेत. दृश्यम नंतर गोलमाल अगेन, दे दे प्यार दे दे, दृश्यम २ आणि आता भोला सिनेमात अजय देवगण आणि तब्बू झळकले. भोला नंतर तब्बू आणि अजय देवगणच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय.

(ajay devgan - tabbu work again next movie after bhola movie name is Auron Mein Kahan Dum)

नीरज पांडे यांच्या आगामी 'औरो में कहा दम था' या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमात तब्बू झळकणार हे निश्चित होतं. पण आता या सिनेमात अजय देवगण झळकणार आहे हे सुद्धा निश्चित झालीय. तब्बू आणि अजय देवगण यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगणने सेटवरचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोत नीरज पांडे आणि तब्बू दिसत आहेत.

नीरज पांडेचे सिनेमे ऍक्शन आणि थ्रिलर म्हणून ओळखले जातात. स्पेशल २६, बेबी, एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी,अ वेनस्डे याशिवाय स्पेशल ऑप्स अशा सिनेमा आणि वेबसिरीजचे दिग्दर्शन नीरज पांडेंनी केलंय.

आता 'औरो में कहा दम था' या सिनेमाच्या माध्यमातून नीरज पांडे पहिल्यांदाच रोमँटिक ड्रामा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात अजय देवगण - तब्बूचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. अभिनेता जिमी शेरगील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अजय देवगण आणि तब्बू या वयात तरुणांना लाजवेल अशा सळसळत्या उर्जेत काम करत आहेत. दोघांचे वेगळे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय देवगणचा भोला, मैदान असे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तब्बूचा कुत्ते सिनेमा जानेवारीत प्रसिद्ध झाला. याशिवाय भोला आणि खुफिया या सिनेमात तब्बू झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT