Ajay Devgn doppelganger
Ajay Devgn doppelganger Google
मनोरंजन

Ajay Devgn:'अरे,हा तर हुबेहूब अजय देवगणच..', व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीच काय काजोलही होईल कन्फ्यूज..

प्रणाली मोरे

Ajay Devgn: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या भलताच फॉर्मात आहे. गेल्या वर्षात त्याच्या 'दृश्यम २' नं बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालून अनेक कोटी खिशात टाकले. आणि अर्थात अजयच्या अभिनयानंही सगळ्यांची दाद मिळवली.

आता तर त्याच्या आगामी 'भोला' सिनेमाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तब्बू आहे. यादरम्यान आता अजय सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या त्याच्या डुप्लिकेटचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.(Ajay Devgn doppelganger Kailash chouhan video viral)

अजय देवगणचा डुप्लिकेट

सोशल मीडियावर अजय देवगण सारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. त्याचं नाव कैलाश असं असून त्याला पाहून १ मिनिटासाठी तुम्हीच काय अजय देवगणची बायको काजोलही कन्फ्यूज होईल.

कैलाशच्या इन्स्टाग्रामवर असे काही व्हिडीओ पोस्ट केलेले आहेत ज्यामध्ये तो अजय देवगणच्या गाण्यांवर अभिनय करताना दिसत आहे. तसंच,कैलाश अजय देवगणचे काही गाजलेले संवादही बोलताना दिसत आहे. कैलाशचा चेहरा अजय देवगणच्या चेहऱ्याशी खूपच साम्य दाखवत आहे.

कैलाश चौहाननं आपल्या केसांची स्टाईलही अजय देवगण सारखीच ठेवली आहे. जशी हेअर स्टाईल अजयची ९० च्या दशकात होती.

कैलाशनं आपल्या इन्स्टा बायोमध्ये लिहिलं आहे की,'' तो ज्युनियर अॅक्टर आहे आणि अभिनेता अजय देवगणची मिमिक्री करतो''.

त्याच्या व्हिडीओजवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही जणांना कैलाशचे व्हिडीओ पसंत पडतायत तर काहीजण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. पण कैलाश मात्र यामुळे मागे हटताना दिसत नाहीय. त्यानं अनेक व्हिडीओ आपल्या इन्स्टावर पोस्ट केलेयत.

त्याचे १२०K फॉलोअर्स आहेत आणि आतापर्यंत त्यानं ६८८ पोस्ट केल्या आहेत.

अजय देवगणच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो 'भोला' नंतर 'सिंघम ३' चे शूटिंग सुरू करणार आहे. अजय आणि रोहित शेट्टीची जोडी पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर कमाईची आतिषबाजी करण्यास सज्ज झाली आहे.

अजय देवगणच्या 'दृश्यम २' ला देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. तसंच,आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात अजय देवगणनं एक कॅमियो साकारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

SCROLL FOR NEXT