sanjay leela bhansali and ajay devgn
sanjay leela bhansali and ajay devgn 
मनोरंजन

२२ वर्षांनंतर भन्साळींसोबत काम करणार अजय; 'गंगुबाई काठियावाडी'मध्ये साकारणार 'ही' भूमिका

स्वाती वेमूल

तब्बल २२ वर्षांनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व अभिनेता अजय देवगण एकत्र काम करणार आहेत. भन्साळींच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी अजयने शूटिंगला सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईत भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. याआधी १९९९ मध्ये 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी अजयने भन्साळींसोबत काम केलं होतं. आता 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटात तो करीम लालाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

संजय लीला भन्साळींच्या वाढदिवसानिमित्त २४ फेब्रुवारी रोजी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शाहरुख कान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या टीझरची स्तुती केली. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?
हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून भन्साळींना गंगुबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईला पळून आल्या होत्या. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लालाशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. त्या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुरा गंगुबाईंच्या हातात दिल्याचं म्हटलं जातं. गंगुबाईंनी वेश्या व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधी कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नव्हता, असंसुद्धा सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर जेव्हा मुंबईतून वेश्या व्यवसाय काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाच्या नेतृत्वासाठी गंगुबाईंनी पुढाकार घेतला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT