Ajay Devgn, R Madhavan starrer shaitaan movie released on 8 march 2024 SAKAL
मनोरंजन

Shaitaan Movie: अजय देवगण - आर माधवन होणार 'सैतान'!, नवीन सिनेमाची घोषणा

आर. माधवन - अजय देवगण यांच्या सैतान सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Shaitaan Movie Announcement: सध्या बॉलिवूडमध्ये विविध विषयांवरचे सिनेमे लोकांच्या भेटीला येत आहेत. जानेवारीत 'में अटल हू', 'फायटर' तर फेब्रुवारीत शाहिद कपूरचा 'तेरी बातों में उल्झा जिया' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

अशातच आणखी एका मराठी सिनेमाची घोषणा झालीय. हा आगामी सिनेमा रहस्यमयी थ्रिलर असल्याची घोषणा आहे. तो सिनेमा म्हणजे 'शैतान'.

अजय देवगण - आर माधवन होणार शैतान

शैतान जागृत होतोय! अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर, एज-ऑफ-द-सीट सुपरनॅचरल थ्रिलर शैतान! एक आकर्षक कथा जी तुम्हाला भारतातीत काळ्या जादूच्या घटकांसह भयावह प्रवासात घेऊन जाईल. #शैतान, असं कॅप्शन देत या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

जिओ स्टुडिओ, देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, शैतानची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे आणि विकास बहल दिग्दर्शित आहे.

या तारखेला होणार शैतान रिलीज

'क्वीन' सिनेमातून लोकांच्या पसंतीस उतरलेले दिग्दर्शक विकास बहल या सिनेमातून पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धूरा सांभाळणार आहे. या सिनेमाचं पोस्टर बघून अनेकांनी तुंबाड सिनेमाशी शैतानशी तुलना केलीय.

या सिनेमाच्या निमित्ताने आर. माधवन आणि अजय देवगण पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा ८ मार्च २०२४ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

SCROLL FOR NEXT