ajit pawar, sunetra pawar, kiran mane, kiran mane news SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: अचानक अजितदादांची बायको सुनेत्राताईंचा फोन आला आणि.. किरण मानेंची पोस्ट व्हायरल

अजितदादांची बायको सुनेत्राताईंचा फोन आल्याने किरण माने भारावून गेले आहेत

Devendra Jadhav

Kiran Mane News: गेली काही दिवस किरण माने विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. किरण माने यांचा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सत्कार होतोय. बिग बॉस मराठी ४ मुळे मुंबईत सह ग्रामीण भागात मानेंची प्रचंड हवा आहे.

वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली.

नुकताच किरण माने यांना अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्नी सुनेत्राताईंचा (Sunetra Pawar) फोन आला होता. माने यांनी सोशल मीडियावर हा अनुभव सर्वांसोबत शेयर केला.

(Ajit pawar wife Sunetratai got a call and.. Kiran Mane's post went viral)

किरण माने यांचा नुकताच सुनेत्राताईंच्या एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. स्वतः अजितदादांची बायको सुनेत्राताईंचा फोन आल्याने किरण माने भारावून गेले आहेत. किरण माने यांनी फोटो शेयर करत त्यांना आलेला अनुभव शेयर केला. माने लिहितात.. "किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनादिवशी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे." फोरमचं काम मला माहित होतं. त्यामुळे एका क्षणात होकार दिला.

माने पुढे सांगतात "...अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय !

एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे"

पुढे सुनेत्रावहिनींच्या कार्याचा गौरव करताना किरण माने लिहितात,"कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो !

पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्या अथक परीश्रम घेतात.

हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम आहे हे.

काल पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना 'वसुंधरा पुरस्कार' आणि विविध क्षेत्रात जगभर नांव कमावणार्‍या निवडक बारामतीकरांना 'बारामती आयकाॅन' पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं."

किरण माने शेवटी सांगतात.. "बारामती हे माझं जन्मगांव. कोर्‍हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे, कुठल्याही संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे माझे मामा तानाजीबापू, नंदूआबा, तात्या आणि कुटूंबीय...

सन्मित्र नितिन यादव, महादेव बालुगडे, अमोल काटे, ॲड.अमर महाडिक.. असे अनेक 'जिवातले गणगोत' बारामतीनं मला दिले. अशा भूमीत, अशा समाजभान जपणार्‍या कार्यक्रमात, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करावं यासारखा दूसरा आनंद नाही.

याप्रसंगी माझ्या माणसांच्या नजरेत दिसलेलं कौतुक आणि अभिमान, ही माझी यापुढच्या संघर्षातली शिदोरी आहे."

किरण माने बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या मराठी सिनेमात झळकणार आहेत. याशिवाय महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात किरण माने झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT