Ajith Kumar Movie esakal
मनोरंजन

Ajith Kumar Movie : चित्रपट पाहून चाहता बाहेर आला भलताच 'चार्ज' झाला! बिचाऱ्याचा जीव गेला, त्यानं चक्क...

भारतामध्ये चित्रपटाचं वेड काय आहे हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून भारताकडे पाहिले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Ajith Kumar thunivu movie fan dead viral social media : भारतामध्ये चित्रपटाचं वेड काय आहे हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून भारताकडे पाहिले जाते. दरवर्षी भारतामध्ये तीनशे हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपटांचा भारतीय समाजमनावर मोठा परिणाम दिसून आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक मोठी बातमी व्हायरल होत असून त्या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ बॉलीवूडच नाहीतर टॉलीवूडमध्ये तर चित्रपटाचे भयंकर वेड आहे. तेथील चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. प्रसिद्ध कलाकार अजित कुमार यांच्या चित्रपटाबाबत एक वाईट घटना घडली आहे

Also Read - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

त्याचे झाले असे की, साऊथचे सुपरस्टार अजित कुमार यांच्या एका चाहत्याचे निधन झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये राहणाऱ्या भरत कुमार यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्याचा अपघात झाला आहे. तो अजित यांचा थुनिवू हा चित्रपट पाहण्यासाठी थिटएरमध्ये गेला होता. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर तो एवढा उत्तेजित झाला होता की, त्यामुळे त्याचा जीव गमवावा लागला आहे.

Ajit Kumar Movie

चित्रपट पाहिला आणि त्यानं चालत्या ट्रकमधून उडी मारली. तो अॅक्शन स्टंट करण्यात व्यस्त होता. मात्र ट्रकचा अपघात झाल्यानं त्याचे निधन झाले आहे. ट्रकमधून खाली पडल्यानं त्याला खूप गंभीर दुखापत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. ११ जानेवारीला थलापती विजयचा वरिसु देखील रिलिज झाला असून तो पाहण्यासाठी तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.

स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना चेन्नईतील रोहिणी थिटएरच्या बाहेर घडली. भरत कुमार हा अजितचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी गेला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT