Akanksha Dubey Suicide
Akanksha Dubey Suicide Esakal
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide: 'तुच मारलंय आकांक्षाला', बॉयफ्रेंड समर सिंहवर आरोपांचे ढग दाटले?

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं 26व्या वर्षी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तिने वाराणसीतील हॉटेलमध्ये गळफास लावून जिवन संपवलं आहे. आकांक्षा हिनं आत्महत्येपुर्वी अनेक गोष्टी केल्या.

तिच्या मृत्यूनंतर अने धक्कादायक खुलासे होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे मरण्याच्या काही तासांपुर्वीच तिनं हसत नाचत व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती असं काही पाउल उचलेलं असं कुणाला वाटलंही नव्हतं.

त्यानंतर ती कुणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीत गेली अन् हॉटेलला आल्यावर इंस्टावर लाईव्ह आली. तिनं चाहत्यांशी संवाद साधला.ती यावेळी खुप रडतांनाही दिसली. त्यानंतर काही तासातच तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत.

तिच्या आत्महत्येनंतर पहिला संशय गेला तो तिचा प्रियकर सिंगर समर सिंग याच्यावर आला आहे. कारण आकांक्षाच्या मागील काही पोस्ट पाहिल्या असता तिचा ब्रेकअप झाला होता का? असा प्रश्न उपस्थीत होत आहे. आकांक्षा दुबेने 14 फेब्रुवारी 2023 रोजी तिचं नातं सार्वजनिक केलं.

समर सिंहसोबतचा फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याआधी दोघेही सोशल मीडियावर सतत रील शेअर करत असत, तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली होती, पण जेव्हा ते अधिकृत झाले तेव्हा चाहत्यांना आणखी आनंद झाला.

आकांक्षाने आत्महत्या केल्याने अभिनेत्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने दोन रडणारे इमोजी पोस्ट केले आणि लिहिले – निशब्द. RIP. हॅशटॅगसोबत आकांक्षा दुबेचं नावही लिहिले होतं.

आता या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी समर सिंगचे चांगलचं धारेवर धरलं आहे. आकांक्षा तुझ्यावर प्रेम करत होती पण तू तिच्याकडे दुर्लक्ष केलेस... काहीतरी नक्कीच चुकीचं झालं आहे. यासगळ्यात नक्कीच त्याचा हात नक्कीच आहे.असं चाहत्यांचा आरोप आहे.

अशाप्रकारच्या कमेंटही त्याच्या पोस्टला येत आहेत. एकानं कमेंट केलीय, 'यात समर सिंहचा हात आहे.' एकानं लिहिलयं की, 'त्याच्या आयडीमध्ये आकांक्षाचा फोटोही नाही.' एकजण म्हणाला, 'मला वाटतं या आत्महत्येचं कारण तूच आहेस.'

तर दुसरीकडे समरच्या चाहत्यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. त्याने असं काहीच न केल्याचा दावा ते करत आहेत.

Akanksha Dubey Suicide

आकांक्षा दुबेच्या मृत्यूच्या काही तास आधीच सकाळी पवन सिंहसोबतचा तिचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. या गाण्याला मिलिअनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. 'आरा कभी हारा नहीं' हे पवन सिंग आणि शिल्पी राज यांनी गायले आहे आणि त्यात पवन सिंग आणि आकांक्षा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT