Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide,
Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide,  Esakal
मनोरंजन

Akanksha Dubey Case: पाच कोटींचं कर्ज अन् मारण्याची धमकी? आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; दोघांवर गुन्हा दाखल..

सकाळ डिजिटल टीम

Akanksha Dubey News: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या करत आपलं जिवन संपवलं आहे. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये अभिनेत्रीचा मृतदेह सापडला आहे.

अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आता या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

या प्रकरणी सारनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंबईहून वाराणसीला पोहोचलेल्या आकांक्षाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाचे वळण आले आहे. समर सिंहवर आकांक्षाच्या कुटूंबाने गंभीर आरोप केले आहेत. समर सिंह त्यांच्या मुलीला धमकावत असल्याचा आरोप मामा, मावशी आणि आजोबांनी केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. एवढेच नाही तर त्याने आकांक्षाकडून ५ कोटी रुपये घेतले होते. तिने त्याच्याकडे पैसे मागितले असता तो तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा.

नाहीतर त्या विषयावर बोलणं टाळायचा. यासोबतच कुटुंबीयांने या प्रकरणाला हत्येचे नाव दिले आहे. समर सिंहने त्याच्या भावासह ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे त्याच्याकडून करण्यात येत आहे.

आत्महत्येपुर्वी शनिवारी रात्री उशिरा आकांक्षाला हॉटेलमध्ये सोडणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला. हा तरुण 17 मिनिटे आकांक्षाच्या खोलीत थांबला, त्यानंतर निघून गेला.

पोलिसांच्या शोधात हा तरुण लंका पोलिस स्टेशन हद्दीतील टिकरी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.

आकांक्षा दुबेला हॉटेलमध्ये सोडणाऱ्या व्यक्तीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो आणि आकांक्षा एकमेकांना चांगले ओळखत होते. शनिवारी रात्री आकांक्षाने त्याला पांडेपूर येथे भेटून लिफ्ट मागितली होती. यावर तो त्यांना त्यांच्या हॉटेलवर सोडून निघून गेला. सध्या या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

आता या आत्महत्याप्रकरणात आणखी काय नवीन खुलासे होतात हे तर कळेलच. त्याचबरोबर समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांनाही पोलिस ताब्यात घेतील. त्यानंतर त्याच्याकडून या प्रकरणात आणखी काही माहिती मिळेल. आकांक्षा दुबेच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी विंनती तिचे कुटूंबिय करत आहे.

आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास करत आहेत. पोलीस तिच्या मोबाईलची चौकशी करत असून मोबाईलवरून आकांक्षाच्या मृत्यूचे रहस्य उलगडू शकते असे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT