OMG 2 Video Esakal
मनोरंजन

OMG 2 Video: भस्म लावून आले शंकर भगवान! अक्षयला तुम्ही ओळखलं नाही का?

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ओह माय गॉड 2 सिनेमांमुळे चर्चेत आहे. त्याचे सलग ५ सिनेमे फ्लॉप झाले त्यामुळे तो चर्चेत होताच आता त्यात त्याचे बरेच सिनेमे हे प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ओह माय गॉड 2 कडून अक्षय आणि त्याच्या चाहत्यांना खुप अपेक्षा आहेत. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि या चित्रपटासंबधित अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुकही आहेत. आता अक्षयने चाहत्यांची अपेक्षा आणखी वाढवली आहे.

(Akshay Kumar OMG 2 Teaser)

अक्षय कुमारने चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात माय गॉड 2 चा पहिला टीझर पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचं सागितंल. अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे. ज्यात चित्रपटाचं BGM ऐकू येते.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार गर्दीतून पुढे येताना दिसत आहे आणि लोक हर हर महादेवचा जयघोष करत आहेत. डोक्यावर जटा, कपाळावर भस्म, गळ्यात नील आणि रुद्राक्षाची माळ घातलेला अक्षय कुमार बाबा भोलेनाथसारखा पोशाख घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओसोबत अक्षय कुमार मुव्हीजने कॅप्शनही दिले आहे. अभिनेत्याने लिहिले - 11 जुलै रोजी #OMG2 टीझर. 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात #OMG2.

याचबरोबर OMG 2 च्या टीझरची रिलीज डेट 11 जुलै असेल असं सांगितली आहे. बातमीनुसार, 1 मिनिट 34 सेकंदाच्या टीझरला यू प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे ता निर्माते लवकरच तो प्रदर्शिक करणार आहे. ओ माय गॉड 2 मध्ये अक्षय कुमार भगवान महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यामी गौतम वकिलाच्या भुमिकेत आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट दिसेल. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT