akshay kumar avoid non veg for omg 2 teaser bollywood news SAKAL
मनोरंजन

OMG 2 Teaser: आईच्या सांगण्यावरुन अक्षयने OMG 2 साठी अक्षयने त्याग केली ही महत्वाची गोष्ट

'OMG' करत असताना अक्षय कुमारने त्याच्या जीवनशैलीत बरेच बदल केले होते

Devendra Jadhav

OMG 2 Teaser Akshay Kumar News: अभिनेता अक्षय कुमार त्याच्या 'OMG 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा टीझर आज रिलीज झाला. हा सिनेमा त्याच्या 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अक्षय कुमार 'OMG 2'मध्ये भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर 'ओएमजी'मध्ये तो भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. 'OMG' करत असताना अक्षय कुमारने त्याच्या जीवनशैलीत बरेच बदल केले होते. अक्षय कुमारने एका मुलाखतीत हा खुलासा केलाय.

(akshay kumar avoid non veg for omg 2 teaser bollywood news)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अक्षय कुमार 'OMG' चित्रपटात काम करत होता तेव्हा त्याच्या आईने त्याला मांसाहार सोडण्याचा सल्ला दिला होता. वास्तविक, अक्षय कुमारची आई देखील कृष्णाची भक्त होती. त्यांचा असा विश्वास होता की त्यांच्या मुलाने देखील शुद्ध सात्विक आहाराच्या सेवनासह सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.

अक्षय कुमारने आपल्या आईला बॉलिवूड आणि चित्रपटापासून नेहमीच दूर ठेवले होते. पण, जेव्हा अक्षयने त्यांना सांगितले की तो 'OMG' मध्ये भगवान कृष्णाची भूमिका करत आहे. तेव्हा त्याच्या आईला आनंद झाला.

जेव्हा अक्षयच्या आईला समजले की तिचा मुलगा कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे, तेव्हा तिने त्याला फक्त शाकाहारी जेवण खाण्याची विनंती केली. अक्षय कुमारनेही आईचे म्हणणे लगेचच आनंदाने मान्य केले.

आणि 'OMG 2' च्या संपूर्ण शुटींगबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, परेश रावल आणि यामी गौतम देखील यात दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'गदर 2'ही त्याच दिवशी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT