akshay kumar and kapil sharma  Sakal
मनोरंजन

Akshay Kumar: अक्षयच्या त्या कृतीनं कपिलच नाय तर पूर्ण सेटवरील लोक भावुक

या शोमध्ये अक्षय कुमार जेव्हाही गेस्ट म्हणून येईल तेव्हा धमाका होणार हे नक्की, पण हा भागही थोडा भावूक होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या रविवारी प्रसारित होणार्‍या या शोच्या एपिसोडमध्ये खूप नाट्य पाहायला मिळणार आहे.

होय, या स्पेशल एपिसोडमध्ये अक्षय कुमारसोबत नोरा फतेही, दिशा पटानी, मौनी रॉय आणि सोनम बाजवा एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये अक्षय कुमार जेव्हाही गेस्ट म्हणून येईल तेव्हा धमाका होणार हे नक्की, पण हा भागही थोडा भावूक होणार आहे.

जेव्हाही अक्षय कुमार 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचतो तेव्हा शोचा होस्ट कपिल त्याच्या मित्रांना किंवा बहिणीला स्टेजवर बोलावतो, पण यावेळी अक्षय कपिलला सरप्राईज करेल. या एपिसोडमध्ये अक्षय कपिलच्या आईला स्टेजवर बोलावणार आहे, जी तिच्या मुलाबद्दल अनेक गुपिते उघड करताना दिसणार आहे.

या स्पेशल एपिसोडमध्ये कपिलची आई त्याच्या लहानपणापासूनचे मजेदार किस्से सांगणार आहे. कपिलची आई सांगणार आहे की तिचे शेजारी कसे नेहमी तिच्या मुलाबद्दल तक्रार करायला यायचे. पण, प्रत्येक आईप्रमाणे तिनेही नेहमी आपल्या मुलाची बाजू घेतली. कपिलची चेष्टा करत असताना, अक्षय कुमार तिला विचारेल की कपिल तिची चांगली काळजी घेतो का, ज्यावर तिने हसून हो असे उत्तर दिले.

आई आणि मुलाचे हे प्रेमळ नाते पाहून अक्षय कुमारला दीड वर्षापूर्वी निधन झालेल्या आईची आठवण येते. अक्षय शोमध्ये बसून आपल्या आईला कसा मिस करतोय हे सांगताना दिसणार आहे. मग त्याने कपिलच्या आईला स्टेजवर बोलावण्याचा विचार केला. मी नेहमी लोकांना सांगतो की आईच्या चरणी तुम्हाला सर्व काही मिळू शकते.

'द कपिल शर्मा शो'चा हा एपिसोड खूपच भावूक असणार आहे. कपिलची आई तिच्या मुलाची अनेक गुपिते उघड करणार आहे, तर अक्षय कुमार त्याच्या आईबद्दल पूर्णपणे भावूक झालेला दिसेल. अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात इमरान हाश्मी नुसरत भरुचा आणि डायना पेंटीसारखे कलाकार दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT