Akshay Kumar esakal
मनोरंजन

Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय कसा दिसतो?

प्रसिद्ध मराठी - हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar Bollywood Actor chhatrapati Shivaji Maharaj look viral: प्रसिद्ध मराठी - हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. त्यावरुन वेगवेगळे वादही समोर आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता.

मांजरेकर यांच्या या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अक्षयनं महाराजांची भूमिका करावी की नाही याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्याच्याऐवजी आणखी कोणत्या कलाकाराला त्या भूमिकेसाठी घेता आले असते यावरही नेटकऱ्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता अक्षय कुमारचा शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लूक व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडियावर त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे. प्रत्यक्षात चित्रिकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच चर्चेत आलेल्या वादामुळे हा चित्रपट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. चाहत्यांनी नेटकऱ्यांनी अक्षयच्या लूकचे कौतूक केले आहे. त्याला प्रतिक्रिया देत या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT