Akshay Kumar Tom Cruise movie  
मनोरंजन

Akshay Kumar: 'अरे बाबा तो टॉम क्रुझ आहे, त्याच्या एका स्टंटमध्ये आपल्या...' काय बोलून गेला अक्षय कुमार?

टॉम क्रुझ अन् त्याचे चित्रपट यावर आता (Akshay Kumar On Tom Cruise Movie) अक्षय कुमारनं केलेली टिप्पणी ही चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Akshay Kumar News : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा आता त्याच्या वेगवेगळ्या (Bollywood Latest news) प्रोजेक्टसमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. अक्षय कुमारचा आता वेलकम टू द जंगल नावाचा चित्रपट ऑन द फ्लोअर (Welcome To The Jungle Movie) आहे. या सगळ्यात अक्षय कुमारनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यानं हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रुझवर केलेलं वक्तव्य हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

त्याचं झालं असं की, अक्षय कुमारला हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम (Tom Cruise Movie) क्रुझच्या स्टंटबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्याचं म्हणणं (Akshay Kumar Latest news) असं की,टॉमनं त्याच्या एका चित्रपटात दिलेले स्टंट हे बॉलीवूडला काही परवडणारे नाहीत. यावेळी अक्षय कुमारनं बॉलीवूडच्या बजेटचा दाखला दिला आहे.

जगभरामध्ये जे अॅक्शन हिरो आहेत त्या सगळ्यात प्रभावी अभिनेत्यांमध्ये बॉलीवूडच्या अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. यापूर्वी विद्युत जामवाल, (Latest Marathi Entertainment News) टायगर श्रॉफ यांचेही नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी टॉमचा टॉप गन प्रदर्शित झाला होता त्यावेळी तो चर्चेत आला होता. त्याच्या त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. ऑस्करसाठी देखील त्याचे नामांकनही झाले होते.

मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट १ वेळेस टॉम क्रुझ हा चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या चित्रपटातील सीन्स हे लोकप्रिय झाले होते.त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातील मिशन इम्पॉसिबल मध्ये टॉमनं एक खतरनाक स्टंट केला होता. त्यात त्याला मोटारसायकलवरुन उडी मारायची होती. विशेष म्हणजे टॉमनं कुणा स्टंटमॅनची मदत घेत तो सीन दिला होता. त्यात तो यशस्वीही झाला होता.

अक्षय काय म्हणाला?

एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारला टॉमच्या स्टंटबाजीविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, बॉलीवूडमध्ये असे स्टंट होणं थोडं अवघड आहे. पहिली गोष्ट त्या स्टंटबाजीसाठी खूप साऱ्या बजेटची गरज आहे. टॉम त्याच्या चित्रपटात जे स्टंट करतो तेवढ्या खर्चात बॉलीवूडच्या तीन ते चार फिल्मस तयार होतील.

केवळ शुटींगचाच खर्च नाही तर बाकीच्या गोष्टींचाही विचार करावा लागतो. त्या स्टंटची खूप सारी प्रॅक्टिसही करावी लागते. त्याला खूप सारा खर्च येतो. आपण तसे स्टंट करु शकत नाही असे नाही. पण त्यासाठी खूप सारा पैसा आणि मनुष्यबळाची गरज असते. असेही अक्षयनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT