akshay 
मनोरंजन

'कॉफी विथ करण'मध्ये अक्षय कुमारला हा प्रश्न विचारल्यावर त्याने थेट करणचाच घेतला क्लास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-  सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये घराणेहीवरुन वाद सुरु आहे. सुशांतचे चाहते आणि सोशल मिडियावरील युजर्स सतत करण जोहर आणि आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा सारख्या स्टार किड्सवर निशाषा साधत आहेत. याचदरम्यान करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅटशोमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गेस्ट म्हणून अक्षय कुमार दिसून येत आहे.

कॉफी विथ करणमध्ये करण जोहर त्याच्या पाहुण्यांकडून कलाकारांना त्यांच्या अभिनयावरुन रँकिंग करायला सांगतो. याव्हिडिओमध्ये करण जोहर असंच काहीसं करायला सांगत आहे. करणने विचारलेल्या प्रश्नावर अक्षय कुमार लीस्टमध्ये ऐश्वर्या रायचं नाव नसल्यामुळे उत्तर देण्यास नकार देतो.

करण जोहरने अक्षय कुमारला काही अभिनेत्रींची  नावं सांगितली आणि विचारलं की यापैकी सगळ्यात उत्तम अभिनेत्री कोण आहे?पर्यायांच्या लीस्टमध्ये दीपिका, कतरिना, करिना ही नावं असतात. यावर अक्षय कुमार या लीस्टमध्ये ऐश्वर्या रायचं नाव का नाही असं विचारुन याचं उत्तर मी देणार नाही असं म्हटलं होतं. 

करण जोहरला त्याच्या या उलटप्रश्नाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो गांगरुन जाऊन अक्षयला म्हणतो, आता तु मी वाईट असल्याचं भासवत आहे. यावर अक्षय पुन्हा म्हणतो की, परंतु मला आश्चर्य वाटतंय की या लीस्टमध्ये ऐश्वर्याचं नाव का नाही आहे?

घराणेशाहीचा मुद्दा गाजत असताना आता करणचा हा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ऐश्वर्याच्या फॅन क्लबवरुन पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरला पुन्हा टारगेट केलं जातंय. तर काही यूजर्स अक्षय कुमारची बाजू घेताना दिसत आहेत आणि त्याच्या या उत्तराचं कौतुक देखील करत आहेत.  

akshay kumar dodge karan johar question for not having aishwarya rai in list  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

VIDEO : खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण! अपंग पतीला काखेत उचलून घेत महिलेचा ट्रेनने प्रवास; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

SCROLL FOR NEXT