Akshay Kumar Had Said If Prithviraj Flops, He’ll Go Back To Do ...Reveals Chandraprakash Dwivedi Google
मनोरंजन

अक्षयला माहीत होतं 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप होणार? दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

३०० करोडचं बजेट असलेल्या सिनेमानं बॉक्सऑफिसवर ११ दिवसांत फक्त ६२.३० करोडची कमाई केली आहे.

प्रणाली मोरे

अक्षय कुमारचा(Akshay Kumar) सिनेमा 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला आहे. ११ दिवसांच्या आत सिनेमाचा खेळ संपला आहे. सिनेमानं ६२.३० करोडची कमाई फक्त केली आहे. ३०० करोडचं बजेट असलेल्या सिनेमाचं बॉक्सऑफिसवर (Boxoffice Collection)अशी अवस्था खरंच शॉकिंग आहे. 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) फ्लॉप(Flop) होणार हे अक्षयला आधीपासून माहीत होतं असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच त्यानं सिनेमाचे दिग्दर्शक डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदीसोबत याविषयी संवाद साधला होता.(Akshay Kumar Had Said If Prithviraj Flops)

डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदीनं एका मुलाखतीत सिनेमा फ्लॉप होण्याविषयी अक्षय काय बोलला आहे यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्यानं एकदा दिग्दर्शकाला म्हटलं होतं की,''जर हा सिनेमा लोकांना आवडला नाही तर तो यापुढे 'रावडी राठौड','हाऊसफूल' सारखे सिनेमे करेल''. दिग्दर्शकानं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,''जेव्हा एखादा सिनेमा फ्लॉप (Flop) ठरतो तेव्हा निर्मात्याचं मोठं नुकसान होतं. त्याचं मन सर्वात जास्त दुखावतं. यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत बनलेला हा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे. जर या सिनेमाला यश मिळालं तर यशराज सिनेमा आणखी अशा पद्धतीचे सिनेमे बनवण्यात रस दाखवेल. यशराज नाहीतर एकामागोमाग एक सिनेमे बनवतच आहेत. पण मग ते आपल्याला ज्यात यश मिळतंय तसेच सिनेमे बनवतील''.

यानंतर दिग्दर्शकानं अक्षय कुमारविषयी देखील भाष्य केलं आहे. दिग्दर्शक म्हणाले,''मला आठवतंय अक्षयनं मला खाजगीत सांगितलं होतं आणि मुलाखतीतही सांगितलं होतं की,''मी 'रावडी राठौड' आणि 'हाऊसफुल' सिनेमात काम केलंय. तशा सिनेमात जास्त पैसा मिळतो. 'सम्राट पृथ्वीराज' हा मी केलेला एक प्रयोगशील प्रयत्न आहे. जर लोकांना हा माझा सिनेमा आवडला नाही तरी चिंतेचं काही कारण नाही. मी पुन्हा 'रावडी राठौड' सारखे मसालापट करणार. लोकांना असे सिनेमे पहायचे आहेत ,ज्याच्यात काही कॉन्ट्रोव्हर्सी नाही''.

अक्षयला ज्याची भीती होती तेच झालं. लोकांनी 'सम्राट पृथ्वीराज' ला रिजेक्ट केलं. त्याच्या अभिनयावरही प्रश्नचिन्ह उठवले. सिनेमा सुपरहिट होईल अशी आशा होती पण सिनेमाची एवढी बिकट अवस्था झाली की प्रेक्षकच मिळेना. आता हा सिनमा फ्लॉप झाल्यावर अक्षयचा पुढचा प्लॅन काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन, वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ड्रग लॉर्ड एल मँचोचा एन्काउंटर! सर्वात मोठं कार्टेल लष्करी कारवाईत उद्ध्वस्त; मेक्सिकोत उसळला हिंसाचार

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळीचे संकट ! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT