renuka akshay- nupur 
मनोरंजन

अभिनेत्री नुपूरच्या मदतीसाठी अक्षयकुमार आला धावून...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः  दिया और बाती हम, अगले जनम मोहे बिटिया किजो अशा काही मालिकांमध्ये काम करणाऱ्या नुपूर अलंकारला आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत हवी आहे, असे तिची अभिनेत्री मैत्रीण रेणुका शहाणेने सोशल मीडियावर आवाहन केले होते. आता नुपूरला मदत अभिनेता अक्षय कुमारने केली आहे. त्यामुळे अभिनेत्री रेणुका शहाणेने अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री नुपूर अलंकारचे पैसे पीएमसी बँकेत होते. ही बँक घोटाळ्यात अडकल्यामुळे नुपूरचे पैसे तेथे अडकले आहेत. सध्या नुपूरची आई आजारी आहे आणि तिच्याकडे असलेले पैसे आईच्या उपचारासाठी खर्च झाले आहेत. त्यामुळे आता तिला आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे तिला मदतीची गरज आहे,असे आवाहन  नुपूरची मैत्रीण अभिनेत्री रेणुका शहाणे हिने सोशल मीडियावर केले होते. 

अक्षय कुमारला ही बाब लक्षात आली आणि त्याने रेणुकाचे पती आशुतोष राणा यांना फोन केला आणि मिळेल असे सांगितले. रेणुकाने सोशल मीडियावर याबद्द्ल अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. रेणुका शहाणे म्हणते, की देवदूतांसारखा अक्षय कुमार धावून आला आहे. त्याने आशुतोषला फोन केला आणि किती रकमेची गरज आहे असे विचारले. रक्कम सांगताच त्याने त्या रकमेपेक्षा अधिक रक्कम नुपूरच्या बँक खात्यामध्ये टाकली. खरोखर देवदूतांसारखा तो धावून आला. त्याचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT