Akshay Kumar Post about 'Statue Of Unity' Instagram
मनोरंजन

Akshay Kumar: अक्षयच्या 'या' फोटोतून पुन्हा दिसलं मोदी प्रेम, गुजरातमध्ये जाऊन लोकांना केलं आवाहन...

अक्षय कुमार आणि भारतीय जनता पक्षात मैत्रीचं नातं आहे याचे दाखले याआधी अनेकदा मिळाले आहेत.

प्रणाली मोरे

Akshay Kumar: अक्षय कुमार आणि भाजपामध्ये मैत्रीचे नाते आहे हे याआधी अनेकदा समोर आलं आहे. अक्षयचा पृथ्वीराज चौहान यांच्यावरील सिनेमा पहायला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हजेरी लावली होती. अनेकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ अक्षयच्या पोस्टने देखील लक्ष वेधून घेतले आहे. आता देखील सोशल मीडियावर अक्षयनं एक पोस्ट केली आहे ज्यामुळे अक्षयच्या मोदीप्रेमाची चर्चा सुरू झाली आहे.(Akshay Kumar Post about 'Statue Of Unity')

अक्षयनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला निरखून पाहिलं तर अक्षयच्या समोर दूरवर 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' दिसत आहे. अर्थात यावरनं स्पष्ट होतंय अक्षय गुजरातच्या भूमीत आहे,मोदींच्या राज्यात. त्यानं 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टीपत फोटोला कॅप्शन दिलं आहे की,''मी एकता नगर मध्ये आहे. 'स्टॅच्यु ऑफ युनिटी', जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूजवळ आहे. इथे निसर्गाच्या कुशीत अनेक गोष्टींचा आनंद घेण्यासारखा आहे. तुम्ही भेट दिलीय का?'', असं म्हणत अक्षयनं लोकांना त्या ठिकाणाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

आता एकार्थानं अक्षय गुजरातची,तिथल्या निसर्गाची प्रशंसा करत स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देण्याचं लोकांना सुचित करत आहे, म्हणजे गुजरातचं प्रमोशन करत आहे असं म्हटलं तरी चुकीच ठरू नये. अक्षय संधी मिळेल तेव्हा मोदीविषयींचे आपले प्रेम या ना त्या कारणानं व्यक्त करत असतो,हे यावरनं पुन्हा स्पष्ट झालं. अक्षयच्या या फोटोवर लोकांनी मात्र प्रतिक्रिया नोंदवताना त्याला 'हेराफेरी ३' मध्ये काम करण्याची विनवणी देखील केली आहे.

अक्षय कुमारनं आपल्या मानधनात ४० टक्क्यांनी कपात केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. त्यानं स्वतः एका कार्यक्रमात हे जाहीर केलं. यामागचं कारण सांगताना मंदीचा मुद्दा त्यानं उचलून धरला. प्रेक्षकांवर भार पडू नये म्हणून आपण मानधन कमी करतोय असा कुठेतरी त्याचा म्हणण्याचा अर्थ होता. अक्षयनं २०२२ मध्ये केलेले सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले ज्या प्रत्येकासाठी त्यानं १०० करोड ते १३५ करोड चार्ज केले होते. पण आता कुठे जाऊन त्याला शहाणपण सुचलंय हे देखील नसे थोडके. अक्षयचा 'रामसेतू' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यालाही फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT