Akshay Kumar Ramsetu much ahead of ajay devgn's thank god in advance booking.
Akshay Kumar Ramsetu much ahead of ajay devgn's thank god in advance booking. Instagram
मनोरंजन

Advance Booking: अजयचा 'थॅंक गॉड' की अक्षयचा 'रामसेतू', तिकीट विक्रीत कोण मारतंय बाजी?

प्रणाली मोरे

Advance Booking: बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारसाठी २०२२ हे वर्ष फार काही चांगलं राहिलेलं नाही. हे वर्ष संपायला आता केवळ दोन महिने उरलेयत आणि अक्षयच्या खात्यात अद्याप एकही बडा सिनेमा नाही. 'बच्चन पांडे','सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षाबंधन' हे त्याचे तिन्ही सिनेमे बॉक्सऑफिसवर दणकून आपटले.

आता अक्षय दिवाळीच्या मुहूर्तावर आपला आणखी एक सिनेमा घेऊन भेटीस येत आहे. खरंतर जेव्हापासून या सिनेमाची घोषण झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांना सिनेमाविषयी उत्सुकता होती, २५ ऑक्टोबर रोजी अक्षयचा बहुचर्चित-बहुप्रतिक्षित 'रामसेतू' थिएटरमध्ये प्रदर्शित केला जात आहे. सिनेमात अक्षय एका आर्कियोलॉजिस्टची व्यक्तिरेखा साकारत आहे,जो प्रभु रामचंद्र यांच्या कथेतील मोठमोठ्या दगडांनी बनलेल्या पुलाच्या शोधात आहे.(Akshay Kumar Ramsetu much ahead of ajay devgn's thank god in advance booking.)

रामसेतू सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसत आहे की अक्षय आणि त्याची टीम या पौराणिक काळात बनलेल्या पुलाचा शोध घेऊन त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. सिनेमा रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे,काही वादांनीही सिनेमाला घेरलं होतं. मात्र सिनेमाच्या ट्रेलरला लोक अधिक पसंत करताना दिसत आहेत. अशात आता 'रामसेतू' ला बॉक्सऑफिसवरही चांगलं यश मिळेल असं वातावरण निर्माण झालं आहे. पण अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग अभिनित 'थॅंक गॉड' सिनेमाही २५ ऑक्टोबरलाच रिलीज होत आहे ज्या दिवशी अक्षयचा 'रामसेतू' रिलीज होतोय. त्यामुळे बॉक्सऑफिसवर दोन्ही सिनेमांची चांगलीच टक्कर होणार आहे. पण चाहत्यांसाठी मात्र दुहेरी मेजवानी ठरणार हे देखील नक्की.

गुरुवारी संध्याकाळी दोन्ही सिनेमांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. चला जाणून घेऊया,अॅडव्हान्स बुकिंगचं ट्रेंड काय सांगत आहे.

'रामसेतू'चे Advance Booking-

रामसेतू सिनेमांचं बुकिंग गुरुवारी संध्याकाळी काही ठरविक ठिकाणी सुरू झालं आणि हळूहळू आणखी काही ठिकाणी ते सुरू केलं गेलं. दोन दिवसांत सिनेमाच्या ९ हजार तिकीटांची विक्री झाली आहे. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की,'रामसेतू'च्या अॅडव्हान्स बुकिंगची कमाई २५ लाखाहून अधिक झाली आहे.

रामसेतूचं बजेट १०० करोड इतकं असल्याचं बोललं जात आहे. सिनेमा हिट होण्यासाठी १४ ते १५ करोडचं ओपनिंग गरजेचं आहे. या वर्षातला ट्रेंड राहिला आहे की, लोक सिनेमा पहायला जाण्याआधी त्याचा रिव्ह्यू वाचतायत किंव सिनेमा आधी ज्यांनी पाहिलाय त्यांचे मत जाणून घेण्यासाठी वाट पाहताना दिसत आहेत. येणाऱ्या दोन दिवसांत 'रामसेतू'चं अॅडव्हान्स बुकिंग अधिक वाढेल आणि २५ ऑक्टोबरला ८० हजार ते १ लाख पर्यंतच्या तिकीटांचे अॅडव्हान्स बुकिंग ही एक चांगली सुरुवात मानली जाईल.

थॅंक गॉडचे Advance Booking-

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अजय देवगणचा 'थॅंक गॉड' अक्षय कुमारच्या 'रामसेतू' च्या तुलनेत मागे असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, 'थॅंक गॉड' सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंग हे ६००० पेक्षा कमी झाले आहे. याचं अॅडव्हान्स बुकिंग १५ लाख रुपयांच्या आसपास झाल्याचं बोललं जात आहे. 'थॅंक गॉड'चे बजेट ७५ करोड इतकं आहे. या हिशोबानं पाहिलं तर 'रामसेतू' पेक्षा भले अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमा मागे असला तरी हिट होण्यात फार अडचण येणार नाही.

अजयच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर दिवाळीत रिलीज झालेले त्याचे सिनेमे हिट झाले आहेत, यात 'ऑल द बेस्ट','गोलमाल ३' सारख्या कॉमेडी सिनेमे सामिल होते. 'थॅंक गॉड' देखील एक कॉमेडी सिनेमा आहे. त्यामुळे अजयच्या कॉमेडी सिनेमांप्रती चाहत्यांना असलेली क्रेझ कदाचित त्याला सरप्राइज देऊ शकते. पण सध्या सोशल मीडियावरचं वातावरण थोडं अनुभवलं तर अक्षयच्या 'रामसेतू' ची चर्चा अजयच्या 'थॅंक गॉड' पेक्षा थोडी अधिक होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT