akshay 
मनोरंजन

१० वर्षाच्या चिमुकल्याने रेखाटलं अक्षय कुमारचं स्केच, ट्विटरवर अक्षयने केली स्तुती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अक्षय कुमारच्या चिमुकल्या चाहत्याने त्याचं स्केच काढलंय. या १० वर्षाच्या चिमुकल्याच्या आईने सोशल मिडियावर त्याचं हे स्केच शेअर केलंय. अक्षयची नजर जेव्हा या स्केचवर पडली तेव्हा अक्षयनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाच्या आईने अक्षय कुमारला हे स्केच टॅग केलं आहे. लहान मुलाने काढलेल्या या स्केचचं सोशल मिडियावर चांगलं कौतुक होतंय.  

अक्षय कुमारने जेव्हा हे स्केच पाहिलं तेव्हा त्याने देखील यावर प्रतिक्रिया दिली. त्या लहान मुलाच्या आईने अक्षयला टॅग करत लिहिलं होतं की, 'माझ्या १० वर्षाचा मुलगा आदित्य शर्माचे हे पहिलं स्केच आहे आणि आशा आहे की हे तुम्हाला आवडेल. मला माहित आहे की हे परफेक्ट नाही मात्र त्याला जितकं शक्य आहे तेवढं त्याने परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते की तुम्ही हे पाहाल आणि शक्य असेल तर प्रतिक्रिया द्याल. धन्यवाद.'

यानंतर अक्षयची नजर या स्केचवर पडली आणि हे स्केच पाहून त्याने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. अक्षयने लिहिलं, 'खूप छान वाटलं, कृपया आदित्यला माझ्याकडून धन्यवाद सांगा. मला हे खूप छान वाटलं की त्याने त्याच्या पहिल्या स्केचसाठी मला निवडलं. माझं प्रेम आणि प्रार्थना त्याच्यासाठी.'

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'गुड न्युज' या सिनेमात शेवटचा दिसला होता. अक्षय आता रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी', चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या 'पृथ्वीराज' आणि आनंद एल राय यांच्या  'अतरंगी रे' या सिनेमाच्या तयारीमध्ये लागणार आहे.    

akshay kumar reacted on social media to a beautiful sketch made by a 10 year old fan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT