Akshay Kumar OMG 2: Esakal
मनोरंजन

Akshay Kumar OMG 2: 'फ्लॉप चित्रपटांचा बादशाह' ठरल्यानंतर अक्षयनं कमी केली फी..OMG2 साठी घेतले फक्त...

Vaishali Patil

Akshay Kumar OMG 2: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार हा सध्या त्याच्या OMG 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र गेले काही वर्ष अक्षयसाठी खुपच वाईट ठरले आहे. त्याचे सलग पाच ते सहा चित्रपट फ्लॉप गेले आहेत. त्यामुळे अक्षयवर फ्लॉप हा टॅग बसला आहे.

याचाच परिणाम असा की, गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. नुकताच अक्षयचा सेल्फी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता मात्र तो देखील बॉक्स ऑफिसवर आपटला.

सूर्यवंशी, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू हे सर्व अक्षयचे फ्लॉप सिनेमे आहेत, जे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे बजेटही पुर्ण करु शकले नाही.

फ्लॉप सिनेमाचा फटका आता अक्षयच्या स्टारडमवर झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याचा OMG 2 हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये येणार आहे.

पण आता त्याच्या स्टारडमचा प्रभाव दिसून येत आहे. याचे कारण असे की मिडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, अक्षय कुमारने आधीच त्याची फी कमी केली आहे.

अक्षय स्वतः सतत फ्लॉप चित्रपटांमुळे नर्व्हस होऊ लागला आहे. त्यामुळे त्याने आधिच OMG 2 साठी खुप कमी फी घेतल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, अक्षय कुमार सहसा एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त पैसे घेतो.

मात्र यावेळी त्याने OMG 2 साठी फक्त 35 कोटी रुपये फी घेतली आहे, असा दावा मिडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

OMG 2 या चित्रपटाच्या टिझर नंतरच वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने देखील हा चित्रपट रिव्ह्यूसाठी पाठवला आहे. कारण, आदिपुरुषप्रमाणेच OMG 2 मुळे देखील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असा आरोप करण्यात आला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही दृश्यांना देखील नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे अक्षयला या चित्रपटाबाबत कोणतीही जोखिम घ्यायची नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अमित राय दिग्दर्शित, 'OMG 2' हा परेश रावल आणि अक्षय कुमार स्टारर चित्रपटाचा याच नावाचा सिक्वेल आहे. OMG 2चित्रपटात यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात यामी गौतम वकीलाच्या भुमिकेत दिसणार आहे. ११ ऑगस्टला रिलीज होतोय.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट दिसेल. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून तो मराठी चित्रपटातही एन्ट्री करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT