akshay 
मनोरंजन

बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतो अक्षय कुमार? केला स्वतःच खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  बॉलीवूड आणि बी-टाऊनच्या पार्ट्यांची चर्चा हा सगळ्यांचाच आवडता विषय. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पार्टी करायला कोणाला आवडणार नाही? सेलिब्रिटींना तर पार्टी म्हणजे सजुन धजुन जाण्याची आणि ऍन्जॉय करण्याची एक संधीच असते. अनेक कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर असले तरी ते पार्टीपासून मात्र दूर राहू शकत नाही. रात्रभर केल्या जाणाऱ्या बॉलिवूडच्या या जंगी पार्ट्यांमध्ये अक्षय कुमार मात्र कधीही दिसत नाही. अक्षय हा बॉलिवूडमधील अशा अपवादात्मक कलाकारांपैकी एक आहे जो पार्ट्यांमध्ये जाणं टाळतो.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने पार्टीमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं. अक्षय कुमार अभिनेता असूनही तो पार्ट्यांमध्ये जाऊन एन्जॉय का करत नाही? या प्रश्नावर  तो म्हणाला, “पार्टीत गेलं की तुम्हाला देखील मग पार्टी द्यावी लागते.” अर्थात त्याने हे उत्तर गंमत म्हणून दिलं. पण खरी गोष्ट ही आहे की  तो स्वत:चे नियम कधीच मोडत नाही. रात्री लवकर झोपतो  आणि सकाळी लवकर उठतो.

सकाळी चार वाजता उठून तो व्यायाम करतो. जर रात्रभर पार्टी केली तर सकाळी व्यायाम करायला उशीर होईल आणि मग संपूर्ण दिवसाचं नियोजन बिघडून जाईल. त्यामुळे अक्षय पार्ट्यांमध्ये जाणं टाळतो. यापूर्वी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये त्याने हे कारण सांगितलं आहे. अक्षयच्या या वेळापत्रकांच त्याच्या चाहत्यांकडून अनेकदा कौतुक झालं आहे. संपूर्ण इंडस्ट्रीला त्याच्या या नियोजनाची आता सवय झाली आहे. 

akshay kumar revealed why he does not attend bollywood parties  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT