Akshay Kumar Says Like On Jamia Violence Tweet Was By Mistake 
मनोरंजन

अक्षय कुमार चुकला; दिले 'हे' स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

मुंबई : दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे विद्यार्थी नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एका व्हिडीओला लाईक करणे अक्षय कुमारला महाग पडले असून त्याला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षयच्या त्या व्हिडिओला लाईक केले आणि प्रकरण इतके वाढले की, त्याला यावर खुलासा करावा लागला आहे. सोशल मीडियावर जामिया विद्यापीठ आंदोलनाचे व्हिडीओ व पोस्ट व्हायरल होत आहे. काही व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली तोडफोड दाखवली आहे तर काहींमध्ये पोलिसांची अमानुष मारहाण. अशाच एका व्हिडीओला अक्षयने लाईक केले.

अक्षयने लाईक केलेल्या व्हिडीओत आंदोलकांची पळापळ दिसतेय. झाले असे की, अक्षयने हा व्हिडीओ चुकून लाईक केला आणि त्याने लाईक केलेली पोस्ट क्षणात व्हायरल झाली.साहजिकच यानंतर अक्षयला ट्रोल करणे सुरु झाले. अक्षयला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने यावर खुलासा केला. ट्वीट स्क्रॉल करताना चुकून ही पोस्ट लाईक झाली. मी अशा कुठल्याही कृत्याचे समर्थन करत नाही. मी लगेच ही पोस्ट अनलाईक केली होती, असा खुलासा अक्षयकुमारने केला आहे. अक्षयला काहींनी ट्रोल करताना सोशल मीडियावर काही विरोधात #BoycottCanadianKumar सारखे तर  #ISupportAkshay सारखे समर्थनार्थ  हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT