मनोरंजन

कपिल शर्माच्या का पाया पडला अक्षय कुमार?

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' (the kapil sharma show) चे नुकतेच ग्रॅण्ड प्रिमिअर पार पडला. काही दिवसांपुर्वी अर्चना पुरन सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी चाहत्यांना सांगितले होते की, या शोचे शूटिंग ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 'द कपिल शर्मा शो' च्या प्रिमिअरला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay kumar) हजेरी लावणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. अक्षय त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ (bell bottom) च्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे. कपिल शर्माने (kapil sharma) नुकताच अक्षयसोबतचा एक जून्या एपिसोडमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कपिलने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले.

कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय त्याच्या पाया पडताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून कपिलने त्याला कॅप्शन दिले,'सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा बेलबॉटमसाठी आशीर्वाद घेताना'. बेल बॉटम या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल कपिलने अक्षयला टॅग करून ट्विट केले होते, 'अप्रतिम ट्रेलर अक्षयजी. 'बेल बॉटम'च्या संपूर्ण टिमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.' त्यावेळी कपिलच्या ट्विटला रिप्लाय करत अक्षयने लिहीले होते, 'जेव्हा तुला समजलं की मी शोच्या सेटवर येत आहे तेव्हा लगेच तू शुभेच्छा पाठवल्यास त्याआधी नाही. भेटूनच तुझी खबर घेतो'

बेल बॉटम या चित्रपटामध्ये अक्षयसोबत लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित एम तिवारी यांनी केले आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यासर्वांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT