Akshay Kumar Prithviraj Movie esakal
मनोरंजन

अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय.

Akshay Kumar Prithviraj Movie : अक्षय कुमार एका वर्षात किमान चार तरी चित्रपट करत असतो. त्याच्याकडं भरपूर चित्रपट येत असतात. मात्र, तो निवडक चित्रपटांनाच पसंती दर्शवितो. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. हा चित्रपट यावर्षी 10 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेसोबतच कलाकारांचे फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आले आहेत.

यशराज फिल्म्सच्या (Yashraj Films) बॅनरखाली बनलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली असून ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे चार पोस्टर शेअर करून ही माहिती दिलीय. आदर्श यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'पृथ्वीराज हा चित्रपट यशराज फिल्म्सतर्फे 10 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्शनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या चार पोस्टर्समध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद (Sonu Sood) यांचे फर्स्ट लूक पोस्टर्सही आहेत.

या पोस्टर्समध्ये अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहानच्या (Prithviraj Chauhan) भूमिकेत दिसणार असून माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय, संजय दत्त (Sanjay Dutt) काका कान्हाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सोनू सूद चांद वरदाईच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच, अक्षय कुमारच्या 'छोटे मियाँ बडे मियाँ' या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. या चित्रपटात अक्षय कुमार बडे मियाँच्या भूमिकेत दिसणार असून टायगर श्रॉफ (Tiger Shroff) छोटे मियाँच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT