sooryavanshi 
मनोरंजन

'सूर्यवंशी'चा नवा विक्रम; २४ तासांत विकली गेली तब्बल इतकी तिकिटं

..तर एका सेकंदाला १७ तिकिटं विकली गेल्याची 'बुक माय शो'ची माहिती

स्वाती वेमूल

गेल्या वर्षभरापासून रोहित शेट्टी Rohit Shetty दिग्दर्शित 'सूर्यवंशी' Sooryavanshi या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते करत होते. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या दिवशी या बिग बजेट चित्रपटाने २६.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे अवघ्या २४ तासांत या चित्रपटाचे सात लाखांहून अधिक तिकिट विकले गेले आहेत.

'बुक माय शो'ने दिलेल्या माहितीनुसार, 'सूर्यवंशी' या चित्रपटाचे एका सेकंदाला १७ तिकिटं विकली गेली आहेत. यावर रोहित शेट्टीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग लिहित रोहित शेट्टीने प्रेक्षकांचे आभार मानले. 'डोंट अंडररेस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन', असं त्याने लिहिलं.

५ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशीचे एका सेकंदाला १७ तिकिटं विकली गेली. तर २४ तासांत सात लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली, असं 'बुक माय शो'ने ट्विटमध्ये लिहिलं आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT