Akshaye Khanna  
मनोरंजन

अक्षय खन्नाने सांगितलं अविवाहित असण्यामागचं कारण

स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टारकिड आहेत, ज्यांच्या करिअरला फार वेग मिळाल नाही. अनेकदा दमदार अभिनयकौशल्य असूनसुद्धा या स्टारकिड्सच्या नशिबी अपयशच आलं. त्यातीलच एक नाव म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दुरावला आहे. 'ताल', 'हलचल', 'दिल चाहता है', 'रेस' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अक्षय आजही अविवाहित आहे. अक्षयने आजपर्यंत लग्न का केलं नाही, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना अनेकदा पडला असेल. एका मुलाखतीत खुद्द अक्षयनेच यामागचं कारण सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर भविष्यातही कधीच लग्न करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

"कोणतंही नातं आजीवन तसंच राहतं यावर माझा विश्वास नाही. मी स्वत:ला मॅरेज मटेरियल समजत नाही. लग्नामुळे संपूर्ण आयुष्य बदलतं, आपला प्राधान्यक्रम बदलतो आणि मला माझ्या आयुष्यात हाच बदल नकोय. मला कोणालाही कमिटमेंट द्यायचं नाहीये. कोणत्याही बंधनांशिवाय जगायला मला आवडतं. काही काळासाठी एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडावं आणि त्यानंतर ज्याने त्याने आपला वेगळा मार्ग निवडावा, अशी माझी विचारसरणी आहे", असं तो म्हणाला होता. लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. नाती, लग्न, मुलंबाळं, बंधनं या सगळ्या गोष्टींबद्दल वेगळा दृष्टीकोन असल्याने अक्षय खन्नाने आजवर लग्न केलं नाही.

अक्षयने १९९७ मध्ये 'हिमायल पुत्र' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याचा 'बॉर्डर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने 'ताल', 'दिल चाहता है', 'हंगामा', 'हलचल', '३६ चायना टाऊन', 'रेस', 'दिवानगी', 'गांधी माय फादर', 'आक्रोश' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT