Ali Asgar Google
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो' सोडला कारण...';अनेक वर्षांनी अली असगरचा मोठा खुलासा

'द कपिल शर्मा' शो मध्ये दादीच्या व्यक्तिरेखेमुळे अली असगरला भरपूर प्रसिद्धि मिळाली होती.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावर 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) हा शो गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करीत आहे. आजही या शो चा चाहता वर्ग काही कमी नाही. या शो मधील प्रत्येक व्यक्तिरेखा मजेदार आहे आणि त्यांच्या नकला पाहून लोकांची हसून हसून पुरती वाट लागते. काही असे कलाकार आहेत ज्यांचा शो प्रसिद्ध होण्यासाठी मोठा हातभार लागला आहे पण आज ते या शो चा भाग नाहीत. आणि आजही प्रेक्षकवर्ग त्यांना या शो मध्ये मिस करतो. त्यातलीच एक या शो मधील जुनी व्यक्तिरेखा म्हणजे 'दादी'. कपिल(Kapil Sharma)च्या कार्यक्रमात 'दादी' ही व्यक्तिरेखा विनोदी अभिनेता अली असगरने(Ali Asgar) साकारली होती.

या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळेच जेव्हा अलीनं शो सोडला तेव्हा चाहतावर्ग खूप नाराज झाल्याचं दिसून आलं होतं. तेव्हा अलीनं शो का सोडला या प्रश्नावर गप्प राहणं पसंत केलं होतं. पण आज अनेक वर्षांनंतर अली असगरनं 'कपिल शर्मा शो' सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

अभिनेत्यानं काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत या शो ला सोडण्याचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला,''हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी त्यावेळी द्विधा मनःस्थितीत अडकलो होतो. आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला एक निर्णय घेणं गरजेचचं असतं,कोणताही दुसरा पर्याय हातात नसतो. आजही मी शो चा तो रंगमंच मिस करत आहे. आमचं टीमवर्क खूप चांगलं होतं''. याच मुलाखतीत अली पुढे म्हणाला,''एक क्षण असा आला की मला वाटलं आता मला थांबायला हवं. खूप जास्त तोचतोचपणा आला आहे. माझ्या व्यक्तिरेखेला घेऊन काही माझे वैचारिक मतभेद झाले होते. कारण माझ्या व्यक्तिरेखेला तसा स्कोपही नव्हता आणखी वेगळ्या अॅंगलने दाखवण्याचा. मी शो सोडण्याचं हेच कारण होतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT